ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
'आपला दवाखाना' कार्यान्वीत न झाल्यास आंदोलन : शिवसेना ( उ. बा.  ठा. ) तालुकाप्रमुख हरी खोबरेकर.

'आपला दवाखाना' कार्यान्वीत न झाल्यास आंदोलन : शिवसेना ( उ. बा. ठा. ) तालुकाप्रमुख हरी खोबरेकर.

प्रकाशन: 01 Jul 2024 08:27 PM
वाचन संख्या 137

मालवण | प्रतिनिधी : ‘आपला दवाखाना’ बाबत शिवसेना ( उ. बा. ठा.) तालुका प्रमुख व माजी जि. प. सदस्य श्री. हरी खोबरेकर व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. हिंदूह्रदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने ‘आपला दवाखाना’ योजनेतर्गत मालवण तालुक्यात दवाखाना मंजूर झाला आहे. मात्र प्रत्यक्षात तो सुरूच झाला नसल्याचे आज उबाठा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उघडकीस आणले. आमदार नितेश राणे यांनी हे दवाखाने सुरू असल्याचे सांगत विधानसभा अध्यक्षांची तसेच सभागृहाची दिशाभूल केली आहे. त्यामुळे आमदार राणे यांचा उबाठा सेनेच्यावतीने निषेध करण्यात आला. दरम्यान येत्या काही दिवसात आपला दवाखाना सुरू न झाल्यास उबाठा सेनेच्यावतीने तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशारा उबाठा सेनेचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी आज दिला.

पावसाळी अधिवेशनात काल आमदार वैभव नाईक यांनी जिल्ह्यातील बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू नसल्याचे निदर्शनास आणून दिले. यावर आमदार नितेश राणे यांनी जिल्ह्यातील सर्व दवाखाने सुरू असल्याचे सांगितले. यावरून आज येथील शिवसेनेचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी, माजी नगरसेवक मंदार केणी, उमेश मांजरेकर, उमेश चव्हाण, अक्षय रेवंडकर यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आज येथील तालुका आरोग्य विभागास भेट देत माहिती घेतली. यावेळी तालुक्यास आपला दवाखाना मंजूर आहे. मात्र तो सुरू नसल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी श्री. धनगे यांनी दिली. त्यामुळे आमदार वैभव नाईक यांनी याबाबत विधानसभेत आवाज उठविल्यानंतर आमदार नितेश राणे यांनी हे दवाखाने सुरू असल्याचे जे सांगितले आहे ती बनवाबनवी आज प्रत्यक्ष उघड झाली आहे. सर्व आलबेल आहे असे सांगायचे आणि जनतेची फसवणूक करायची त्याचबरोबर विधानसभा अध्यक्षांचीही त्यांनी फसवणूक केली आहे. त्यामुळे याचा उबाठा सेनेच्यावतीने आम्ही जाहीर निषेध करत आहोत.आपला दवाखाना शासनाने तात्काळ सुरू करून सर्वसामान्य जनतेला चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. याची कार्यवाही येत्या काही दिवसांत न झाल्यास उबाठा सेनेच्यावतीने तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशारा शिवसेना तालुका प्रमुख श्री. खोबरेकर यांनी यावेळी दिला.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स