ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
कुडाळ येथे आपला दवाखान्याला कुलूप ; शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांची सरकारवर टीका.

कुडाळ येथे आपला दवाखान्याला कुलूप ; शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांची सरकारवर टीका.

प्रकाशन: 01 Jul 2024 07:35 PM
वाचन संख्या 137

कुडाळ | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग जिह्यातील प्रत्येक तालुक्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु करण्याचे शासनाने जाहीर केले होते. मात्र जिल्ह्यात आठ तालुक्यांपैकी केवळ कणकवली आणि सावंतवाडी तालुक्यात या दोनच ठिकाणी आपला दवाखाना सुरू करण्यात आला आहे. दोन तालुके म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा नव्हे हे नितेश राणेंनी लक्षात घ्यावे असे सांगत, शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांनी सरकारवर टीका केली आहे. कुडाळ तालुक्यातील आपला दवाखाना पूर्णपणे बंद स्थितीत आहे. आज कुडाळ येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी स्पॉट पंचनामा केला असता याठिकाणी आपला दवाखान्याचा बोर्ड लावण्यात आला आहे. मात्र दवाखान्याला कुलूप लावलेले असल्याचे निदर्शनास आले त्यामुळे आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपला दवाखान्यांचा प्रश्न अधिवेशनात मांडल्याने केवळ दोनच ठिकाणी हे दवाखाने सुरु असल्याचे उघडकीस आले आहे. आ. वैभव नाईक यांनी मांडलेली वस्तुस्थिती खरी असून आमदार नितेश राणे उघडे पडले आहेत. त्याचबरोबर कणकवली येथील आपला दवाखान्यातुन वर्षभरात उपचार घेतलेल्या रुग्णांची जाहीर केलेली आकडेवारी हि केवळ २१३८ आहे. या आकडेवाडीनुसार दिवसाला २ ते ५ रुग्णांनीचा उपचार घेतल्याचे स्पष्ट होते आणि त्यातही प्रत्यक्षात किती रुग्णांना आवश्यक असलेले उपचार मिळाले हा देखील प्रश्न आहे. त्यामुळे सरकारने गाजावाजा केलेली ही योजना राबविण्यात सरकार फेल ठरल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी दिली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स