ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
बांदा मराठा समाज विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम संपन्न.

बांदा मराठा समाज विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम संपन्न.

प्रकाशन: 01 Jul 2024 06:44 PM
वाचन संख्या 333

युवराज श्री. लखमराजे सावंत भोसले आणि मान्यवरांचे मार्गदर्शन.

बांदा | प्रतिनिधी : विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी गुणवत्ता टिकवून ठेवली पाहिजे. ग्रामीण भागातील शिक्षण पूर्ण करुन तुम्ही पुढील शिक्षणासाठी मोठ्या शहरात जाणार त्याठिकाणी तुम्ही गुणवत्तेत कमी पडू नये यासाठी आतापासूनच तुमच्या शिक्षणाचा दर्जा तुम्ही उंचावला पाहिजे, असे मत सावंतवाडी संस्थान चे युवराज श्री. लखमराजे सावंत भोसले यांनी बांदा मराठा समाज गुणवंत विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी सावंतवाडी संस्थान युवराज श्री. लखमराजे सावंत भोसले, प्रमुख अतिथी सावंतवाडी मराठा समाज अध्यक्ष श्री. सिताराम गावडे, सावंतवाडी मराठा समाज समन्वयक मकरंद तोरसकर, बांदा उपसरपंच तथा माजी अध्यक्ष राजाराम उर्फ बाळू सावंत, मराठा समाज अध्यक्ष विराज परब, बांदा मराठा समाज महीला अध्यक्षा सौ. स्वाती सावंत, माजी अध्यक्ष निलेश मोरजकर, मुख्य प्रवर्तक गुरुनाथ सावंत, उद्योजक तथा माजी उपाध्यक्ष आनंद गवस,माजी सचिव म. गो. सावंत, उद्योजक नारायण गावडेआदि मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे बांदा मराठा समाज्यावतीने मंडळाच्या सदस्यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.

युवराज श्री. लखमराजे सावंत भोसले पुढे म्हणाले की, पुढील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला स्पर्धा परीक्षा द्याव्या लागतील आणि या परिक्षेच्या अभ्यासासाठी तुम्हाला कठोर मेहनत घ्यावी लागेल तरच भविष्यात तुमच्या पालकांचे तुमच्या बद्दल चे स्वप्न पंर्ण होईल. आपल्या मराठा समाज्यातील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी कोणतेही अडचण भासल्यास आपल्याशी संपर्क करण्याचे आवाहन सावंतवाडी संस्थान चे युवराज श्री. लखमराजे सावंत भोसले त्यांनी व्यासपीठावरुन बोलताना केले.तसेच विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

आतापासूनच विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करुन त्या ध्येया प्रमाणे परिश्रम घेतले पाहिजे. तरच तुमचे शिक्षणाचे पुढील उद्दिष्ट पुर्ण होण्यास सोपे होईल. शिक्षण घेत असताना प्रत्येक विद्यार्थ्याला अनेक अडचणी येत असतात. या अडचणीवर मात करून जो विद्यार्थी पुढे जातो तो आपल्या ध्येयापर्यंत सहज पोहचतो असे मत सावंतवाडी मराठा समाज अध्यक्ष सिताराम गावडे यांनी बांदा मराठा समाज गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा कार्यक्रमात प्रमुख अतिथी भाषणात बोलताना व्यक्त केले. ते म्हणाले आपल्या पाल्याकडे पुर्ण लक्ष पालकाचा असला पाहिजे. आपला पाल्य मोबाईल चा कशा पद्धतीने वापर करतोयं तसेच त्या मोबाईल चा पार्सवड सुद्धा पालकाला माहीत असला पाहिजे. असे सिताराम गावडे यांनी सांगितले. बांदा मराठा समाज मंडळ गेली अनेक वर्षे अशा पद्धतीने मराठा समाज्यातील बांधवांसाठी तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रम राबवत आहेत. खरोखरच या मंडळाचे कार्य स्तुत्य असल्याचे मत श्री. सिताराम गावडे यांनी व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात बांदा मराठा समाज सचिव आनंद वसकर म्हणाले बांदा मराठा समाज गेली दहा वर्षे दशक्रोशितील मराठा बांधवांसाठी, विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवत आहे. यामध्ये विद्यार्थ्यांसाठी मराठा दाखला शिबीर,आरोग्य कर्मचारी यांचा सत्कार, पूरग्रस्तासाठी मदत,असे उपक्रम राबविले गेले. यापुढे या मंडळाचे कार्य असेच पुढे चालू रहाणार असल्याचे सांगितले.

बांदा मराठा समाजातर्फे युवराज श्री. लखमराजे सांवत भोसले, सावंतवाडी मराठा समाज अध्यक्ष सिताराम गावडे, यशस्वी उद्योजक श्री. आनंद गवस, श्री. नारायण गावडे यांचा शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

बांदा उपसरपंच तथा माजी अध्यक्ष राजाराम उर्फ बाळू सावंत, अध्यक्ष विराज परब, गुणवंत विद्यार्थी प्रतिनिधी प्रणव नाईक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दहावी, बारावी, नवोदय विद्यालय निवड, टेलेंट सर्च परिक्षेत यशस्वी व गुणवंत विद्यार्थी, विद्यार्थ्यांचा भेट वस्तू, प्रमाणपत्र, पेन, गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला. यावेळी सहसचिव हेमंत मोर्ये, खजिनदार महेश मोर्ये, मिलिंद सावंत,रत्नाकर आगलावे, राकेश परब,सचिव आनंद वसकर, ग्रा.पं. सद-या सौ. रेश्मा सावंत, राखी कळगुंटकर,माधवी गाड, ममता सावंत,रिना मोरजकर,दिक्षा सावंत,लक्ष्मण पावसकर, माजी सरपंच दिपक सावंत, हनुमंत सावंत,लता रेडकर,लव रेडकर,सौ.स्मिता परब,विकी कदम,अमोल सावंत,शाम गवस, लक्ष्मी सावंत,सागर सावंत, अमोल गाड,माजी सचिव संतोष सावंत,समीर सावंत, सुकाजी गावडे, निलेश कदम आदि उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. राकेश परब तर आभार प्रदर्शन सौ. माधवी गाड यांनी केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 16
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 322

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स