ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
बांद्यातील पतंजली योग समिती तर्फे ऍडव्हान्स योगा उपक्रम..!

बांद्यातील पतंजली योग समिती तर्फे ऍडव्हान्स योगा उपक्रम..!

प्रकाशन: 19 Oct 2021 11:05 PM
वाचन संख्या 44

बांदा : राकेश परब : पतंजली योग समिती बांदा व गोवा राज्य पतंजली यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक १७ ते रविवार दिनांक २४ या आठ दिवसाच्या कालावधी करिता ‘ऍडव्हान्स योगा’ या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबीर येथील विठ्ठल-रखुमाई सभागृहात दररोज सकाळी साडेपाच वाजता सुरू होणार आहे. बांदा दशक्रोशितिल सर्व लोकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी भारत स्वाभिमान, पतंजली गोवा राज्यचे प्रभारी श्री कमलेशजी, पतंजली योग संस्कार गोवा राज्य प्रभारी विश्वास कोरगावकर, पतंजली युवा भारत अध्यक्ष गोवा राज्य श्री गिरीश आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अधिक माहितीसाठी विकी केरकर (मो. 9404496434), सुदन केसरकर (मो. 9422065153), अनिल मणियाद (मो. 9922265636), संजय नाईक (मो. 9422379174) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. योग शिबिरासाठी येताना सर्वांनी योगा सतरंजी, चादर किवा तत्सम वस्तू, पाणी बॉटल व रुमाल सोबत घेऊन येण्याचीही सूचना आयोजकांनी केली आहे.

फोटो :प्रातिनिधिक गुगल

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स