रिक्षा चालक मालकांच्या वतीने श्री. संतोष सावंत यांचा वाढदिवस साजरा
कणकवली : ऑटो रिक्षा चालक मालक कणकवली संघटनेचे अध्यक्ष श्री. संतोष सावंत यांचा वाढदिवस कणकवली रेल्वे स्टेशन, गोठवदेव या ठिकाणी, २६ जून रोजी साजरा करण्यात आला. याप्रसंगी सर्व रिक्षा चालक मालकांच्या वतीने त्यांना शाल श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी श्री. संतोष सावंत यांनी सर्वांच्या शुभेच्छांचा स्विकार करुन आभार मानले. यावेळी ते म्हणाले की, रिक्षा चालक मालकांचे जे प्रश्न आहेत ते मार्गी लावण्याचा प्रयत्न करेन तसेच कणकवली शहरातील रिक्षा संघटना मजबूत करून रिक्षा चालक मालकाला हक्काचे स्थान देण्याचा प्रयत्न राहील. तसेच रिक्षा चालक मालकां साठी विविध उपक्रम राबविण्यात येतील अशीही ग्वाही श्री सावंत यांनी यावेळी दिली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)