देवबाग येथे समुद्री कासवांना जीवदान.
मालवण | ब्युरो न्यूज : मालवण तालुक्यातील देवबाग येथे मंगळवारी दोन समुद्री कासवे जाळ्यात अडकलेल्या अवस्थेत स्थानिक मच्छिमारांना सापडून आली. त्यांची पंकज मालंडकर, नितिन बांदेकर, संदिप चिंदरकर, बाबा कुमठेकर, देवानंद चिंदरकर, दिपराज मालंडकर या मच्छिमारांनी जाळ्यातून सुटका करत त्यांना समुद्रात सोडले. त्याचबरोबर तारकर्ली येथे दुर्मिळ असे हॉक्सबिल प्रजातीचे कासव किनाऱ्यावर सापडले. या कासवाची येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्कुबा डायव्हिंग अँड वॉटर स्पोर्ट्स (इसदा) च्या कर्मचाऱ्यांनी सुटका केली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)