ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
व्यसनापासून दूर तोच खरा शूर ; मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांचे मसुरेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.

व्यसनापासून दूर तोच खरा शूर ; मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांचे मसुरेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.

प्रकाशन: 24 Jun 2024 06:31 PM
वाचन संख्या 189

मसुरेत आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन निमित्त अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांची माहिती व जागृती कार्यक्रम संपन्न.

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे येथे आंतरराष्ट्रीय अंमलीपदार्थ विरोधी दिनानिमित्त आर. पी. बागवे हायस्कूल आणि एम जी बागवे तांत्रिक विद्यालय मसुरे येथील विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ सेवन केल्याने होणारे दुष्परिणाम व त्यापासून बचाव कसा करावा याबाबत मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात मालवण पोलिस निरीक्षक श्री. प्रवीण कोल्हे यांनी उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.

यावेळी पो. नि. प्रविण कोल्हे म्हणाले की अंमली पदार्थांचे व्यसन हा एक आजार आहे जो तरुण पिढीवर सतत प्रभाव टाकून चुकीचा परीणाम करत आहे. यामुळे सर्वांगीण विनाश होतो. हा वाढत जाणारा आजार असून तरुणांचा मोठा वर्ग दारू, सिगारेट, तंबाखू, अंमली पदार्थ यांसारख्या विषारी पदार्थांच्या आहारी जात आहे. त्यामुळे अमली पदार्थांच्या दुष्परिणामांची वेळीच माहिती असणे आवश्यक आहे. अंमली पदार्थांचा गैरवापर आणि बेकायदेशीर तस्करी विरुद्ध दरवर्षी २६ जून हा दिवस  अंमली पदार्थांच्या ‘दुरुपयोग मुक्त’ जगासाठी कृती आणि सहकार्य मजबूत करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो अशी माहिती मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली. अंमली पदार्थांना जवळ करण्यापेक्षा दूर ठेवणे, यातच खरी शूरता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी मुख्या. सौ अर्चना कोदे, सहा. शिक्षक रमेश पाताडे, सुनील बांदेकर, शशांक पिंगुळकर, एन. एस. जाधव, श्री घाटे, भरत ठाकूर, मसुरे पोलीस कॉन्स्टेबल विवेक फरांदे, मालवण पोलीस कॉन्स्टेबल कैलास ढोले, सौ सोनाली कोदे, विशाखा जाधव, सौ. आर्या भोगले, समीर नाईक, दयानंद पेडणेकर, भानुदास परब, अनिल मेस्त्री, चरणदास फुकट आदी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विध्यार्थी उपस्थित होते. स्वागत रमेश पाताडे तर आभार भरत ठाकूर यांनी मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स