ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
पंचक्रोशी ठाकर समाज कणकवली यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

पंचक्रोशी ठाकर समाज कणकवली यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन.

प्रकाशन: 21 Jun 2024 02:25 PM
वाचन संख्या 100

सिंधुदुर्ग | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयात अनुसूचित जमातीचा अनुशेष भरण्यात यावा अशी मागणी पंचक्रोशी ठाकर समाज कणकवलीच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे, दि. १९ जून रोजी दिलेल्या एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

या निवेदनात असे म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपील क्रमांक ८९२८/२०१५ व इतर याचिकांमध्ये ६ जुलै २०१७ रोजी ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी खुद्द शासनानेच न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र दिले होते. परंतु मार्च २०२० च्या शेवटच्या आठवड्यात कोरोना प्रादुर्भाव असल्याने ही भरती प्रक्रिया झाली नाही. महाराष्ट्र सरकारने १४ डिसेंबर २०२२ रोजी शासन निर्णय निर्गमित करून गट क व ड मधील पदे भरण्याचे कार्यवाही ३१ जुलै २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे आणि शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून एक महिन्यात जाहिरात प्रसिद्ध करण्याचे निर्देश दिले होते. शासन निर्णय काढून दिड वर्ष उलटले तरीही आजपर्यंत आदिवासींची १२५०० पदे राज्यात शासकीय, निमशासकीय, शासकीय उपक्रमातील संवैधानिक संस्था, जिल्हा परिषद, नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायत, मंडळे, महामंडळे, विद्यापीठ व संलग्न महाविद्यालय, कृषी विद्यापीठ शासकीय व खाजगी शिक्षण संस्था अशा सर्व प्रकारच्या संस्था मंडळांच्या आस्थापनेवरील पदे भरलेलीच नाहीत. आदिवासी समाजाच्या विशेष पदभरतीसाठी २०२१ पासून सातत्याने विधानसभा विधान परिषदेत वारंवार चर्चा झाली सरकारने आदिवासी समाजाला पद भरतीची आश्वासने दिली पण अद्यापही पदभरतीची प्रक्रिया सुरू केली नाही. त्यामुळे आदिवासी समाजात बेरोजगारीचे प्रमाण वाढलेले आहे. घटनात्मक हक्काच्या नोकरीसाठी बेरोजगार आदिवासी उमेदवार तडफडत आहेत सरकारने विशेष पद भरती मोहीम अद्याप पर्यंत सुरू केलेली नाही.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमध्ये मार्च २०२४ अखेर अनुसूचित जमातीची सामान्य प्रशासन विभाग, ग्रामपंचायत विभाग, बालकल्याण विभाग, वित्त विभाग, शिक्षण विभाग, कृषी विभाग, आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभाग, बांधकाम विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जलसंधारण विभाग (ल. पा.) वर्ग ३ आणि वर्ग ४ चे सामान्य प्रशासन विभाग मिळून २३० पेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्गमध्ये मार्च २०२४ अखेर सर्व जात प्रवर्गनिहाय मंडल अधिकारी, अव्वल कारकून, लघु टंकलेखक, म हसूल सहाय्यक, वाहन चालक, तलाठी अशी एकूण मिळून जवळपास २२४ प्रदे रिक्त असूनें शिपाई १५ पदे रिक्त आहेत. तरी आपणास विनंती आहे की लवकरात लवकर जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आणि जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे वरील संवर्गांची भरती प्रक्रिया सुरू करून आदिवासी बेरोजगार समाजावर त्यांची हक्काची नोकरी मिळविण्यास मदत करावी, अशी मागणी पंचक्रोशी ठाकर समाज कणकवली यांच्यावतीने अध्यक्ष अमित ठाकूर व सचिव समीर ठाकूर यांनी मुख्यमंत्री यांना केलेली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स