नगरपरीषद बांधकाम विभागाने 'दिल्या तारखेला' वाहतुकीसाठी रस्ता केला पूर्ववत..!
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण नगरपरिषद बांधकाम विभागाने आगामी पावसाळा कालावधी विचारात घेऊन आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने, शहरातील मामा वरेरकर नाट्यगृह नजीक स्वामी हॉटेल जवळ पावसाळी पाणी निचरा होण्यास आरसीसी रोड क्रॉसिंग गटर बांधकाम करण्यासाठी, राज्य मार्ग क्र. १८२ (मालवण – कसाल) ‘वझे कॉर्नर ते मामा वरेरकर नाट्यगृह ते हॉटेल स्वामी ते भरड’ या शहरातील महत्वाच्या मार्गावरील वाहतूक १४ जून पासून पुढील किमान ०७ दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती देऊन बांधकाम सुरु केले होते. त्यानुसार आज २१ जून रोजी हा रस्ता वाहतुकीसाठी ‘दिल्या तारखेला’ पूर्ववत खुला झाला आहे. हा रस्ता आता वाहतुकीसाठी खुला केला आहे असे नगरपरीषद बांधकाम विभागाच्या वतीने जाहीर केले गेले आहे.
या बांधकाम कालावधीमध्ये नागरीक, विद्यार्थी, वाहनचालक, पादचारी व पर्यटक यांनी पर्यायी मार्गाचा वापर करुन रोड क्रॉसिंग गटार बांधकाम करण्यास सहकार्य केल्याबद्दल मालवण नगरपरिषद बांधकाम विभागाने सर्वांचे आभार मानले आहेत
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)