ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
आमदार वैभव नाईक यांनी केली ऑफलाईन पद्धतीने ई- पीकपाणी नोंदणीची मागणी..!

आमदार वैभव नाईक यांनी केली ऑफलाईन पद्धतीने ई- पीकपाणी नोंदणीची मागणी..!

प्रकाशन: 19 Oct 2021 06:45 PM
वाचन संख्या 58

नेटवर्क रेंज नसलेल्या भागात ऑफलाईन पद्धत अवलंबायची आमदार वैभव नाईक यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी…

ओरोस | प्रतिनिधी : जिल्ह्यातील अनेक दुर्गम भागातील गावांमध्ये मोबाईल रेंज नसल्याने ई- पीकपाणी ऑनलाईन नोंदणी करताना शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. याबाबत कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी काल जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांची भेट घेऊन ई- पीकपाणी नोंदणी ऑफलाईन पद्धतीने करण्याची मागणी केली. त्यावर जिल्हाधिकारी यांनी ज्या ठिकाणी मोबाईल रेंज नसेल त्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने ई- पीकपाणी नोंदणी करण्यात येणार असल्याचे सांगितले. ई- पीकपाणी नोंदणीची मुदत वाढवून देण्यात यावी. तसेच नोंदणीबाबत शेतकऱ्यांना संपूर्ण माहिती देण्यात यावी. त्याच बरोबर सध्या भात कापणीचा हंगाम सुरु असून शासनाकडून होणाऱ्या भात खरेदीमध्ये देखील सुलभता यावी अशी मागणी आ. वैभव नाईक यांनी केली. याबाबतही तहसीलदारांना सूचना करण्यात येतील असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स