आरे येथील सत्यवती कदम यांचे निधन ; पोलीस पाटील राजेंद्र कदम यांच्या आई होत.
शिरगांव | प्रतिनिधी : देवगड तालुक्यातील आरे – आरेश्वरवाडी येथील ज्येष्ठ नागरिक सत्यवती बाबाजी कदम ( ८५ ) यांचे सोमवार दि २२ मे रोजी रात्री १२.३० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात ४ मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पत्रकार कै. अनिल कदम, पोलीस पाटील राजेंद्र कदम यांच्या त्या आई तसेच आरे गावच्या विद्यमान सरपंच सौ. ममता सतीश कदम यांच्या त्या सासू होत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)