ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचे  निधन ; भारत - पाक सामन्याला होती काळेंची उपस्थिती.

मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचे निधन ; भारत - पाक सामन्याला होती काळेंची उपस्थिती.

प्रकाशन: 10 Jun 2024 06:32 PM
वाचन संख्या 283

क्रीडा | ब्यूरो न्यूज : मुंबई क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष अमोल काळे यांचे न्यूयाॅर्क मध्ये निधन झाले. काल, ९ जून रोजीचा भारत विरुद्ध पाकिस्तान यांचा टी – ट्वेंटी विश्वचषकातील साखळी सामना पाहण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये अमोल काळे उपस्थित होते.

सामना संपल्यानंतर काही वेळानंतर त्यांना ह्रदयविकाराच्या तीव्र त्यांचे निधन झाले असे क्रीडा सूत्रांकडून समजते आहे. त्यांच्या निधनानंतर मुंबई क्रिकेटवर शोककळा पसरली. अमोल काळे यांची ऑक्टोबर २०२२ मध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) अध्यक्षपदी निवड झाली होती. अमोल काळे यांनी माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांचा या निवडणुकीत २५ मतांनी पराभव केला होता. बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलार यांचा काळे यांना त्या निवडणुकीत पाठिंबा होता.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स