ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
स्व. विजयराव नाईक यांचा नववा स्मृतिदिन ; ३०० नागरिकांची नेत्रतपासणी व ६० जणांवर करण्यात आली मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

स्व. विजयराव नाईक यांचा नववा स्मृतिदिन ; ३०० नागरिकांची नेत्रतपासणी व ६० जणांवर करण्यात आली मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया.

प्रकाशन: 30 May 2024 02:27 PM
वाचन संख्या 102

शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांनी दिला, स्वर्गीय विजयराव नाईक यांच्या सामाजिक जाणिवांच्या आठवणींना उजाळा.

वडिलांच्या समाजकार्याचा वारसा जपण्याचा प्रयत्न : आमदार वैभव नाईक.

कणकवली | प्रतिनिधी : स्वर्गीय विजयराव विष्णू नाईक यांचा नववा स्मृतिदिन आज शिरवल येथील विजयराव नाईक कॉलेज येथे साजरा करण्यात आला.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, मुरलीधर नाईक आमदार वैभव नाईक व उद्योजक सतीश नाईक यांच्या हस्ते विजयभाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. विजयराव नाईक यांच्या स्मृतिदिना निमीत्त विजयराव नाईक कॉलेज ऑफ शिरवलच्या वतीने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले. यामध्ये कुडाळ मालवण तालुक्यात विविध ठिकाणी कॅम्प आयोजित करून ३०० हुन अधीक नागरिकांची नेत्रतपासणी करण्यात आली. तर ६० जणांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली.

यावेळी बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख संदेश पारकर म्हणाले की, स्वर्गीय विजयराव नाईक यांनी विविध क्ष्रेत्रात केलेले समाजहिताचे काम आजही डोळ्यासमोर आहे. गरीब कुटुंबातील लोकांना मदतीचा हात देऊन अनेक लोकांचे संसार त्यांनी उभे केलेले होते. ५० वर्षांपूर्वी कणकवलीचा कायापालट करण्यात विजयराव नाईक यांनी मोठा हातभार लावला होता. समाजसेवेत ते कायम अग्रेसर असत विजयभाऊंचे समाजसेवेचे व्रत जोपासणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले की, सर्वसामान्यांच्या अडीअडचणींना धावून जाणार्‍या विजयराव नाईक यांच्या स्मृती आजही सर्वांच्या स्मरणात आहेत. त्यांच्याबद्दल सर्वांच्याच मनात फार मोठ्या आदराची भावना आहे. वडिलांनी समाजसेवेचा जो आदर्श घालून दिला, त्याचप्रमाणे राजकीय, सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रात त्यांच्या कामाचा वारसा जपण्याच्या प्रयत्न आम्ही करत आहोत असे सांगितले.

यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,संकेत नाईक,राजवर्धन नाईक, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कणकवली तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, शेखर गावडे, संजय पारकर, सचिन आचरेकर,रुपेश आमडोस्कर, नागेश ओरोसकर, योगेश तावडे, भगवान परब, रोहित राणे, रवी कदम, अनंत पाटकर, युवक कल्याण संघाचे खजिनदार मंदार सावंत, कॉलेजचे उपप्राचार्य चंद्रशेखर बाबर आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स