ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
चाफेड सरपंच किरण मेस्त्री आणि ग्रामसेवक हनुमंत तेरसे यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

चाफेड सरपंच किरण मेस्त्री आणि ग्रामसेवक हनुमंत तेरसे यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान.

प्रकाशन: 28 May 2024 08:34 AM
वाचन संख्या 255

गोवा येथील गणपत पार्सेकर कॉलेजऑफ एज्युकेशन मध्ये पुरस्कार सोहळा संपन्न.

शिरगांव | प्रतिनिधी : गोवा सरकार पी डब्लू डी स्टाफ को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. गोवा यांच्या वतीने इंटिग्रेटेड सोशल वेलफेअर सोसायटी बेलगावी नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन तर्फे देवगड तालुक्यातील चाफेड गावचे सरपंच किरण लीलाधर मेस्त्री आणि ग्रामसेवक हनुमंत बाळकृष्ण तेरसे यांना विशेष प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, म्हैसूर फेटा, चंदनाचा कायमस्वरूपी हार व भारत सरकारचे केंद्रीय मंत्री यांचे अभिमान पत्राने मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, गोवा राज्यातील निवडक व्यक्तींना हा राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो. चाफेड सरपंच किरण मेस्त्री, ग्रामसेवक हनुमंत तेरसे यांच्या विकासकामांची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली होती.

यावेळी चाफेड चे माजी सरपंच आकाश राणे, संतोष साळसकर, ग्रा. पं. सदस्य सुदर्शन उर्फ नागेश साळकर, महेश परब, बाबू घाडी, ग्रामसेवक भिसे , साळगावकर तसेच भारतीय सैन्य दलातील अधिकारी, सिने कलाकार, शिक्षण अधिकारी, राजकीय नेते व मठाधीश उपस्थित होते. हा पुरस्कार सोहळा गोवा येथील हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळ, गणपत पार्सेकर कॉलेज ऑफ एज्युकेशन हरमल येथे २६ मे रोजी पार पडला.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स