ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
कोकण विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुक पार्श्वभूमीवर वेंगुर्लेत भाजपाची प्रचार नियोजन बैठक संपन्न.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

कोकण विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुक पार्श्वभूमीवर वेंगुर्लेत भाजपाची प्रचार नियोजन बैठक संपन्न.

प्रकाशन: 28 May 2024 10:15 AM
वाचन संख्या 165

आमदार निरंजन डावखरे यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील मतदारांचा घेतला गेला आढावा.

ब्युरो न्यूज : कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली असून या पार्श्वभूमीवर भाजपाची सावंतवाडी विधानसभा क्षेत्रातील दोडामार्ग , सावंतवाडी व वेंगुर्ले तालुक्याच्या प्रचार नियोजन बैठका घेण्यात आल्या. वेंगुर्ले तालुक्याची बैठक भाजपा तालुका कार्यालयात आयोजित करण्यात आली होती . यावेळी आमदार निरंजन डावखरे , भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर , जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत , पदवीधर निवडणूक जिल्हा संयोजक प्रमोद रावराणे मान्यवर म्हणून उपस्थित होते. यावेळी सर्वप्रथम तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले . त्यानंतर जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळु देसाई यांनी तालुक्यातील पदवीधर मतदारांचा आढावा सांगीतला , तसेच गावनिहाय पहील्या टप्प्यातील निवडणूक यंत्रणेची माहिती दिली. यावेळी या बैठकीस प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर , आमदार निरंजन डावखरे व जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी मार्गदर्शन करुन मतदारांपर्यंत चार टप्प्यात संपर्क करण्यासाठीची यंत्रणा उभी करण्याबाबत मार्गदर्शन केले .

यावेळी भाजपाचे कामगार नेते प्रकाश रेगे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त तसेच मठ उपसरपंच बंटी गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळु देसाई व ॲड. सुषमा खानोलकर , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , मा. नगराध्यक्ष राजन गिरप, तालुका संयोजक प्रशांत खानोलकर , तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर, जिल्हा निमंत्रित साईप्रसाद नाईक, जि. का. का. सदस्य मनवेल फर्नांडिस व वसंत तांडेल, मच्छिमार सेलचे दादा केळुसकर , खरेदी विक्री संघ चेअरमन ज्ञानेश्वर केळजी, महिला अध्यक्षा सुजाता पडवळ, सरपंच संघटनेचे विष्णु उर्फ पपु परब, जेष्ठ कामगार नेते प्रकाश रेगे , युवा मोर्चाचे प्रसाद पाटकर, प्रणव वायंगणकर, समीर नाईक, हेमंत गावडे, नारायण कुंभार, प्रशांत बोवलेकर , मठ उपसरपंच बंटी गावडे, शिरोडा संयोजक मनोज उगवेकर, शक्तिकेंद्र प्रमुख विजय बागकर, गणेश गावडे, सुनिल चव्हाण , तालुका चिटणीस समीर कुडाळकर व नितीन चव्हाण, होडावडा उपसरपंच राजबा सावंत, महिला मोर्चाच्या प्राजक्ता पाटकर, भुषण सारंग , रफीक शेख, नगरसेवक प्रशांत आपटे, बुथ अध्यक्ष बाळु वस्त, प्रमोद वेर्णेकर इत्यादी उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचालन प्रसन्ना उर्फ बाळु देसाई यांनी केले आणि आभार प्रदर्शन सुहास गवंडळकर यांनी केले .

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स