पत्रकारांचा निषेध व आंदोलनबाबत चौकशी करायचे जि प अध्यक्ष सौ संजना सावंत यांचे आदेश..!
दोषींवर कारवाई प्रस्तावित करायच्या सूचना …
कुडाळ|ब्युरो न्यूज: तालुक्यातील शिक्षकांनी पत्रकारांच्या विरोधात पुकारलेल्या आंदोलनाबाबत तातडीने चौकशी करावी.त्याबाबत वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करत व दोषींवर कारवाई प्रस्तावित करावी,असे लेखी आदेश जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांचे प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.याबाबत सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाने लक्ष वेधले होते.
कुडाळ तालुक्यातील शिक्षकांनी पंचायत समिती सभागृहामध्ये शिक्षकांच्या कार्यपध्दतीबाबत झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने वृत्तांकन केल्याच्या पार्श्वभुमीवर पत्रकारांचा निषेध व्यक्त करुन जाहीर आंदोलन पुकारले आहे . तसेच सोशल मिडीयावर याबाबतची पोस्ट प्रसारीत केली आहे.तरी सदर विषयाची त्वरीत चौकशी करुन वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करावा व दोषींवर कारवाई प्रस्तावित करावी,असे आदेश संजना संदेश सावंत यांनी तत्काळ दिले आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)