ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
चाफेड सरपंच श्री. किरण मेस्त्री आणि ग्रामसेवक श्री. हनुमंत तेरसे यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

चाफेड सरपंच श्री. किरण मेस्त्री आणि ग्रामसेवक श्री. हनुमंत तेरसे यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर.

प्रकाशन: 21 May 2024 01:14 PM
वाचन संख्या 256

शिरगांव | प्रतिनिधी : गोवा सरकार पीडब्ल्यूडी स्टाफ को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. गोवा यांच्या वतीने इंटिग्रेटेड सोशल वेलफेअर सोसायटी बेलगावी नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन तर्फे देवगड तालुक्यातील चाफेड ग्रामपंचायत सरपंच श्री. किरण लीलाधर मेस्त्री आणि ग्रामसेवक श्री. हनुमंत बाळकृष्ण तेरसे यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला असून या सोहळ्याचे वितरण रविवार दि. २६ मे रोजी दुपारी १२ वाजता गोवा येथे होणार आहे. दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, गोवा राज्यातील निवडक व्यक्तींना हा राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो. चाफेड सरपंच किरण मेस्त्री, ग्रामसेवक हनुमंत तेरसे यांच्या विकासकामे व विविध शासकीय योजना अंमलबजावणी याची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र विशेष अभिनंदन होत आहे. एक विशेष प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, म्हैसूर फेटा, चंदनाचा कायमस्वरूपी हार व भारत सरकारचे केंद्रीय मंत्री यांच्याकडून अभिनंदन पत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. या पुरस्कार प्रदान सोहळ्याला देशातील अनेक उपस्थित राहणार आहेत.

हा पुरस्कार सोहळा गोवा येथील हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळ, गणपत पार्सेकर कॉलेज ऑफ एज्युकेशन हरमल येथे २६ मे रोजी दु. १२ वाजता संपन्न होणार आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स