ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
दुर्गाच्या डोंगरावरील दुंडा गडाच्या माहिती फलकांचे अनावरण.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

दुर्गाच्या डोंगरावरील दुंडा गडाच्या माहिती फलकांचे अनावरण.

प्रकाशन: 21 May 2024 05:56 AM
वाचन संख्या 213

दुर्गप्रेमींसाठी दुंडा गडावरील विविध सोयीं सुविधांसाठी प्रयत्नशील रहाणार असल्याचे चाफेड सरपंच किरण मेस्त्री यांचे प्रतिपादन.

शिरगांव | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या चाफेड येथील दुर्गाच्या डोंगरातील दुंडा गडावर रविवारी दि. १९ मे रोजी दुर्ग मावळा प्रतिष्ठान व चाफेड ग्रामस्थांच्यावतीने, गडाला भेट देणार्यांच्या सुलभतेसाठी गडावर जाणाऱ्या वाटेवर तसेच महत्वाच्या वास्तूंच्या ठिकाणी माहितीदर्शक फलक लावण्यात आले. यामध्ये गडावर जाणाऱ्या मार्गांवर पाच फलक, घोड्याची पाग, दुर्गाचा चाळा, राजवाडा, विहीर, मुख्य दरवाजा, बुरुज याठिकाणी सहा असे एकूण अकरा फलक यावेळी लावण्यात आले. भविष्यात या गडाचे संवर्धन आणि संशोधन होण्याच्या दृष्टीने तसेच दुर्गप्रेमीना चांगल्या प्रकारे पाहाता यावा, त्यांना अभ्यास करता यावा यासाठी विविध माध्यमातून आपण ग्रामपंचायतीच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने असे प्रयत्न सुरु ठेवणार असल्याचे यावेळी सरपंच किरण मेस्त्री यांनी सांगितले.

या मोहिमेला चाफेड सरपंच किरण मेस्त्री, भजनीबुवा महेश उर्फ बबन परब, साईल पांचाळ, माजी सरपंच संतोष साळसकर, माजी सरपंच आकाश राणे, प्रदिप घाडी, तसेच दुर्ग मावळा प्रतिष्ठानचे कोकण विभागीय अध्यक्ष गणेश नाईक, समिल नाईक, हृदयनाथ गावडे, उत्कर्षा वेंगुर्लेकर, हेमलता जाधव, प्रसाद पेंडूरकर, जालिंदर कदम, वेदांत वेंगुर्लेकर, ऋतुराज सावंत, अक्षय जाधव, प्रविण नाईक आदी उपस्थित होते.

साईप्रसाद मसगे, उत्कर्षां वेंगुर्लेकर, स्मिता जाधव, सुजल ऍग्रो केअर मार्ट, हेमलता भास्कर जाधव, समीक्षा मोहन माळकर, स्मिता सुनिल कोदले, साक्षी खरात, आरती मकरंद वायंगणकर, विजय सावंत,अभिनव रामचंद्र भिंगारे, संगम श्रीकृष्ण चव्हाण यांनी मार्गदर्शक फलकांसाठी तसेच चाफेड ग्रामपंचायत सरपंच किरण मेस्त्री यांनी फालकांच्या पोलांसाठी तसेच सिमेंट, वाळू, यांच्यासाठी आर्थिक सौजन्य केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स