चाफेड - भोगलेवाडी येथील ज्येष्ठ नागरिक अनुराधा राणे यांचे निधन.
शिरगांव | संतोष साळसकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील
देवगड तालुक्यातल्या चाफेड भोगलेवाडी येथील रहिवाशी ज्येष्ठ नागरिक अनुराधा विष्णू राणे ( वय ७३ वर्षे ) यांचे बुधवार दि. १५ मे रोजी रात्री १२.०५ वाजता अल्पशा आजाराने मुंबई, अंधेरी येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात एक विवाहित मुलगा, सून, मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष तथा अंधेरी पश्चिम येथील उपविभागीय अध्यक्ष किशोर राणे यांच्या त्या मातोश्री होत्या.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)