ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मालवणातील वाहतूक कोंडी व अनधिकृत पार्किंग संदर्भात पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांना निवेदन सादर.

मालवणातील वाहतूक कोंडी व अनधिकृत पार्किंग संदर्भात पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांना निवेदन सादर.

प्रकाशन: 18 May 2024 04:46 AM
वाचन संख्या 196

मालवण : मालवण शहरातील वाहतूक कोंडी व अनधिकृत पार्किंग संदर्भात पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांना मालवण नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर यांच्यासह भाजपाच्या शिष्टमंडळाने एक निवेदन सादर केले.

निवडणुकांचा चौथा टप्पा पार पडल्यानंतर पर्यटकांचा ओढा मालवण, तारकर्ली, देवाबागकडे वळला आहे. शहरात मोठया प्रमाणात पर्यटकांची वाहने दाखल झाल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला असून बस स्थानकासह बाजारपेठ, भरडनाका येथे वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसून येत आहे. बस स्थानक नजीकच्या रस्त्यावर खासगी ट्रॅव्हल्स पार्किंग करण्यात येत असल्याने याठिकाणी अनेकदा वाहनांना अडथळा निर्माण होतो. यातून काहीवेळा वादावादीच्या घटना देखील घडतात. काही पर्यटक येथे आपली खासगी वाहने पार्किंग करून अन्यत्र जात असल्याने देखील वाहतूक कोंडीचा प्रकार घडतो. त्यामुळे खासगी ट्रॅव्हल्सचे पार्किंग नगरपालिकेच्या पार्किंगमध्ये अथवा देऊळवाडा सागरी महामार्गावर करण्यात यावे अशी सूचना या निवेदनाद्वारे भाजपाच्या शिष्टमंडळाने पोलीस निरीक्षकांकडे केली. याबाबत संबंधिताना सूचना देण्यात येतील असे पोलीस निरीक्षक कोल्हे यांनी सांगितले.

शहरातील फोवकांडा पिंपळ येथून पर्यटक बंदर जेटीकडे एकदिशा मार्गाने येत असतात. तसेच बंदर जेटीकडून बाजारपेठेत एकदिशा मार्गाने पर्यटकांच्या गाड्या आल्याने या
मार्गातील वाहतूक ठप्प होते. त्यामुळे तिथे वाहतूक पोलीस उपलब्ध करून देण्यात यावा तसेच स्वामी हॉटेल ते भंडारी हायस्कूल मार्गावर वाहनांना प्रतिबंध करण्यात यावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी भाजपाच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला सर्वतोपती सहकार्य करण्याची ग्वाही यावेळी देण्यात आली. यावेळी भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष मंदार लुडबे, राजू बिडये, भाई मांजरेकर, कमलाकर कोचरेकर, संदीप मालंडकर आदी उपस्थित होते.

फोटो सौजन्य : मालवण ब्युरो

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 281

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स