ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
रायबरेली लीगमधून निवडून आणलेले खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तराच्या खेळाडूंसमोर उघडे पडतात ; सुनील गावस्कर खवळले…!

रायबरेली लीगमधून निवडून आणलेले खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तराच्या खेळाडूंसमोर उघडे पडतात ; सुनील गावस्कर खवळले…!

प्रकाशन: 18 May 2024 01:10 AM
वाचन संख्या 149

सय्यद मुश्ताक अली चषकातील खेळाडूंच्या कामगिरीचा विचार करुन आयपिएलचे संघ निवडणे आवश्यक असल्याचाही दिला संघमालकांना सल्ला.

क्रिकेटचा योग्य सन्मान केला नाही तर क्रिकेट तुम्हाला तुमची जागा दाखवून देईलच ; स्वतःला परिपूर्ण समजणार्या क्रिकेटपटूंना सुनिल गावस्कर यांनी समालोचना दरम्यान सुनावले खडे बोल.

क्रीडा : माजी कसोटीपटू तसेच ज्येष्ठ क्रिकेट समालोचक सुनील गावसकर यांनी आयपिएल मध्ये काही प्रतिभावान खेळाडुंच्या घसरलेल्या कामगिरीबद्दल भाष्य करताना खडे बोल सुनावले असून, क्रिकेट खेळाला दुय्यम दर्जा देत स्वतःला परिपूर्ण समजणार्या क्रिकेटपटूंना, क्रिकेट खेळ त्यांची जागा दाखवून देईल असे खवळून सांगितले. १७ मे रोजी वानखेडे मैदानावर खेळवल्या गेलेल्या मुंबई इंडिअन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंटस संघातील सामन्या दरम्यान सुनील गावस्कर समालोचन करत होते त्यावेळी प्रतिभावंत खेळाडुंच्या सुमार कामगिरी बद्दल बोलताना त्यांनी ही गोष्ट सांगितली. खेळाडुंमध्ये प्रतिभा असते परंतु त्यांना पायरी पायरीने शिकत आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंसमोर आणले तरच ती प्रतिभा खेळाडूंसाठी दीर्घकाल टिकते परंतु त्यांना परिपक्व बनायचा किंवा क्रिकेटमधील संघर्षासाठीचा पुरेसा काळ न देता थेट आयपिएल मध्ये खेळवले तर प्रतिभावंत खेळाडूचे खच्चीकरण होऊन तो संपू शकतो असेही त्यांनी स्पष्ट केले. एखादा खेळाडू या स्पर्धेत एखादा मोसम थेट चमकतो देखिल, परंतु नंतर तो तितक्याच वेगाने मागे पडत पडत लुप्त होत जातो असेही त्यांनी कोणत्याही खेळाडूचे नांव न घेता उदाहरण म्हणून स्पष्ट केले.

गावस्कर पुढे म्हणाले की बहुतांश आयपिएल संघमालक हे खेळाडुंची निवड करताना त्यांना थेट रायबरेली लीगसारख्या क्रिकेटमधून खेळाडू निवडले आणि त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंसमोर खेळवले तर ते उघडे पडतात. त्यासाठी राज्यस्तरीय सय्यद मुश्ताक अली चषकातील खेळाडूंच्या कामगिरीचा विचार करुन त्यांना निवडणे आवश्यक असल्याचाही सल्ला त्यांनी संघमालकांना दिला.

मुंबई इंडिअन्सचा संघ त्यांचा शेवटचा सामनाही गमावून गुणतालिकेत शेवटच्या स्थानी राह्यलाने सुनील गावस्कर यांनी अर्ध्या कच्च्या फलंदाज व गोलंदाज यांना परिपूर्ण अष्टपैलू म्हणून खेळवले गेल्याबद्दल जाहीर नाराजीही व्यक्त केली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स