ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
गझलकार कै. मधुसूदन नानिवडेकर यांच्या जयंती निमित्त उद्या तळेरे येथे अभिवादन कार्यक्रम.

गझलकार कै. मधुसूदन नानिवडेकर यांच्या जयंती निमित्त उद्या तळेरे येथे अभिवादन कार्यक्रम.

प्रकाशन: 17 May 2024 11:23 PM
वाचन संख्या 108

तळेरे : दिवंगत जेष्ठ कवी, गझलकार, पत्रकार मधुसूदन नानिवडेकर यांच्या जयंती निमित्त उद्या शनिवारी १८ मे रोजी सकाळी १० वाजता तळेरे येथील चैतन्य नर्सिंग होमच्या प्रांगणातील ‘मधुकट्टा’ येथे अभिवादन करण्यात येणार आहे. तसेच त्यानंतर त्यांच्या स्मृती जागवण्यासाठी नानिवडेकर यांच्या गझला आणि कवितांचे सादरीकरण होणार आहे. याप्रसंगी संवाद परिवारातील सदस्य तसेच मधुसूदन नानिवडेकर यांच्या चाहत्या साहित्य प्रेमींनी उपस्थित राहून सहभागी व्हावे असे आवाहन प्रज्ञांगण आणि संवाद परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.

१८ मे हा दिवस म्हणजे कै. मधुसूदन नानिवडेकर यांचा जन्म दिवस. त्यांचा जन्म दिवस तळेरे पंचक्रोशी पत्रकार मित्र परिवाराच्या वतीने दर वर्षी त्यांच्या उपस्थितीत तळेरे येथे साजरा केला जात असे. पण त्यांच्या अकाली निधनानंतर हा दिवस जयंती दिन म्हणून साजरा करुन त्यांना अभिवादन करण्यात येते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स