ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
हळवल फाटा वळणावर हायमास्टची मागणी..!

हळवल फाटा वळणावर हायमास्टची मागणी..!

प्रकाशन: 13 May 2024 02:43 PM
वाचन संख्या 134

कणकवली | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबई – गोवा महामार्गावरील हळवल फाटा येथे हायमास्ट तथा पथदीप बसविण्याची ग्रामस्थांची मागणी आहे. हळवल फाटा येथील वळण हे अपघात प्रवण क्षेत्र आहे. फाट्यालगत असलेले वळण वाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक आहे. रात्रीच्यावेळी याठिकाणी लाईट नसल्यामुळे वळणाचा अंदाज न आल्याने वारंवार अपघात झाले आहेत. सरपटणारे प्राणी, मोकाट मुके जीव यांचाही या परिसरात वावर आहे. त्यामुळे याठिकाणी स्ट्रीट लाईट बसविणे नितांत गरजेचे आहे. स्ट्रीट लाईट बसविण्याच्या मागणीचे निवेदन प्रांताधिकार्‍यांना ग्रामस्थांनी दिले होते. त्यानंतर याठिकाणी स्ट्रीट लाईट लावण्याबाबत प्रशासकीय पातळीवर कार्यवाही झाली होती. मात्र, अद्यापही या ठिकाणी स्ट्रील लाईट लावण्यात आलेली नसल्याने ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स