ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
कोरगांवकर्स मालवण टेबल टेनीस ॲकॅडमीची दशकपूर्ती  ; ११ व्या वर्षात पदार्पण.

कोरगांवकर्स मालवण टेबल टेनीस ॲकॅडमीची दशकपूर्ती ; ११ व्या वर्षात पदार्पण.

प्रकाशन: 11 May 2024 08:55 PM
वाचन संख्या 193

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रीडा वर्तुळात विशेष सन्मानाची असलेल्या कोरगांवकर्स मालवण टेबल टेनीस ॲकॅडमीने आज ११ मे रोजी ११ व्या वर्षात पदार्पण केले आहे. ११ मे २०१४ रोजी स्थापन झालेल्या मालवण टेबल टेनिस अकॅडमी ने १० वर्षांचा कालखंड पूर्ण करताना टेबल टेनिस खेळाचा प्रसार आणि प्रचार करण्याच्या मुख्य उद्देश परिणामकारक पणे साधला असल्याची प्रतिक्रिया क्रीडा प्रेमी व क्रीडा तज्ञ यांनी व्यक्त केली आहे.

या १० वर्षांच्या क्रीडा प्रवासात ॲकॅडमीने जिल्हा, विभाग आणि राज्य स्तरावर चमकदार कामगिरी करणारे टेबल टेनिस पटू तयार केले. खेळाडुंना वैयक्तिक मार्गदर्शन, अत्याधुनिक रोबोटिक सयंत्राद्वारे प्रशिक्षण, टेबल टेनिस खेळातील प्राविण्यासह मनाच्या एकाग्रतेमध्ये वाढ करुन त्यासोबत खेळाडुंचा व्यक्तिमत्त्व विकास देखील ॲकॅडमीने साध्य केला आहे.

कोरगांवकर्स मालवण टेबल टेनीस ॲकॅडमीचे सर्वेसर्वा विष्णू कोरगांवकर यांच्या या वाटचालीबद्दल त्यांनी ॲकॅडमीचे संपूर्ण श्रेय तमाम मालवणवासीय , क्रीडा प्रेमी, प्रशिक्षणार्थी मुले,त्यांचे पालक यांचा पाठिंबा, सदिच्छा आणि सहकार्य यांना दिले आहे. टेबल टेनीस किंवा कुठलाही खेळ हा खिलाडूवृत्ती ने खेळायला हवा यासाठी मुलांमध्ये खिलाडूवृत्तीची जोपासना व्हावी म्हणून विशेष लक्ष दिला जाते असेही त्यांनी विशेष नमूद केले आहे.

महासिंधु टेबल टेनीस असोसिएशनचे सचिव हेमंत वालकर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक मान्यवर, क्रीडा प्रेमी, पालक, खेळाडू यांनी अभिनंदन करुन कोरगांवकर्स टेबल टेनीस ॲकॅडमीच्या पुढील वाटचालीसाठी सदिच्छा दिल्या आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स