ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहतुक समस्या ; बांदा ग्रामस्थांची महामार्ग वाहतूक व जिल्हा वाहतूक नियंत्रक यांच्याकडे तक्रार.

उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहतुक समस्या ; बांदा ग्रामस्थांची महामार्ग वाहतूक व जिल्हा वाहतूक नियंत्रक यांच्याकडे तक्रार.

प्रकाशन: 13 May 2024 09:02 PM
वाचन संख्या 114

सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. बडवे यांना सादर केले निवेदन.

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा येथे महामार्गावर चालू असलेल्या नियोजित उड्डाणपुलाच्या कामाच्या ठीकाणी कंत्राटदाराकडून बेजबाबदार पणे व नियमबाह्य पद्धतीने मनमर्जीने वाहतूक एकमार्गी वळवण्यात येत आहे ज्यामुळे मागील आठवडाभर महामार्गावरून वाहतूक करणाऱ्या तसेच स्थानिक नागरिकांना वाहतूक कोंडीमुळे प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. मागील आठवड्याभरात सदर ठिकाणी रोज अपघात होत असून ॲम्बुलन्स सारखे अत्यावश्यक सेवा देखील त्यामुळे प्रभावित होत आहे असा आरोप करुन या सर्व त्रासाला कंटाळत बांदा येथील स्थानिक ग्रामस्थ यांनी महामार्ग वाहतूक नियंत्रण कक्ष, मुंबई त्याचप्रमाणे महामार्ग वाहतूक नियंत्रक, सिंधुदुर्ग विभाग यांचेकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेत सदर विभागाकडून दोन वाहतूक नियंत्रकांची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु सदर वाहतूक नियंत्रकांच्या कामकाजाची वेळ संपल्यानंतर सदर ठिकाणी पुन्हा प्रचंड वाहतूक कोंडीची समस्या उद्भवू लागली. याकरता पुन्हा एकदा बांदा ग्रामस्थ एकत्र येत बांदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. बडवे यांची भेट घेत त्यांना निवेदन सादर केले. महामार्ग वाहतूक नियंत्रण कक्ष व जिल्हा वाहतूक नियंत्रक यांच्याशी समन्वय राखत याबाबत त्वरित कार्यवाही करण्याची विनंती करण्यात आली.
यावेळी ग्रामस्थ प्रतिनिधी म्हणून श्री. गुरु कल्याणकर, हेमंत दाभोलकर, प्रशांत बांदेकर, सिद्धेश महाजन,आबा धारगळकर,रूपाली शिरसाट, मनोज कल्याणकर, शैलेश केसरकर, उदय येडवे, स्मिता पेडणेकर, साई सावंत व आशिष कल्याणकर उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 88
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 444

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स