ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
कणकवलीत बसवेश्वर जयंती साजरी.

कणकवलीत बसवेश्वर जयंती साजरी.

प्रकाशन: 11 May 2024 02:16 PM
वाचन संख्या 128

अभिनेत्री अक्षता कांबळी यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण संपन्न.

कणकवली : लिंगायत समाज कणकवली आणि अक्कमहादेवी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने प पू श्री भालचंद्र महाराज आश्रम येथे काल १० मे रोजी बसवेश्वर जयंती साजरी करण्यात आली.

बसवेश्वर जयंती निमित्त लिंगायत समाजाने महिलांची पलकला स्पर्धा, फनी गेम व सर्व वयोगटातील विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात आले होते .यावेळी समाजातील जी मुलं अनेक स्तरावर उत्तम प्रगती करत आहेत व उत्तम यश मिळवलेले आहे अशा सर्व मुलांचा सन्मान चिन्ह देऊन अभिनेत्री सौ. अक्षता कांबळी यांच्य हस्ते गुणगौरव करण्यात आला. यावेळी सौ कांबळी यांनी मालवणी भाषेत सर्वांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमच्या अध्यक्षा माजी नगरसेविका सौ सुप्रिया नलावडे, लिंगायत समाजाचे अध्यक्ष प्रकाश घेवारी, उपाध्यक्ष गजानन उचले, सचिव सचिन टोणेमारे, अजित नष्टे पदाधिकारी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स