ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
भ्रष्टाचाऱ्यांनी लुटलेला पैसा गरीबांना परत करणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी.

भ्रष्टाचाऱ्यांनी लुटलेला पैसा गरीबांना परत करणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी.

प्रकाशन: 10 May 2024 06:54 PM
वाचन संख्या 123

जात, पंथ, धर्माच्या आधारे भेदभाव होऊ नये आणि क्षेत्रीय भेदभाव देखील होऊ नये अशी व्यक्त केली धारणा.

ब्यूरो न्यूज : देशात आता तिसऱ्यांदाही बहुमत मिळवू असा विश्वास सर्व भाजप नेते व्यक्त करत आहेत. या पार्श्वभूमीवर एका वृत्त वाहिनीशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. आगामी काळात देशाची वाटचाल कशी राहील, भाजप आघाडीची काय धोरणे आहेत यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केले. आगामी काळात नवीन किर्तीमान स्थापित करण्यासाठी जनतेच्या आशीर्वादाची गरज आहे. आकाशाच्या मर्यादा आहेत पण मी सुद्धा खूप काहीतरी मिळवण्यासाठी आलो आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

सध्याच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने चारशे पारचा नारा दिला आहे. भाजप नेते आणि स्टार प्रचारक प्रचार सभांतून ही घोषणा करत असतात. भाजपने यावेळच्या निवडणुकीत हीच घोषणा का केली असा प्रश्न विचारण्यात आला त्यावर मोदी म्हणाले की आ्मच्याकडे आधीच बहुमत आहे. मग आमच्या पक्षाचे कार्यकर्ते, पक्षाच्या सदस्यांना पुढे जाण्यासाठी आम्ही या घोषणेच्या माध्यमातून प्रोत्साहन देऊ शकत नाही का…?

अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उद्घाटनावरून होणाऱ्या राजकारणावर विचारले असता पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, राम मंदिरासठी देशातील जनतेने ५०० वर्षे संघर्ष केला. आम्हाला या संघर्षाचा अभिमान आहे. हाच संघर्ष जगभरातील लोकांना प्रेरणा देऊ शकतो. राम मंदिर लोकांना एकत्रित आणण्यासही उपयुक्त ठरू शकते.

काँग्रेस पक्षावर देखील टीका करताना मोदी म्हणाले, मला एका काँग्रेस खासदार आणि लोकसभा निवडणुकीतील उमेदवारानं सांगितलं की काँग्रेस आता माओवादी विचारांच्या जाळ्यात फसली आहे. याचा अर्थ असा आहे की काँग्रेस पक्ष त्यांच्या मूल्यांना समजणारे पक्षातील लोक या माओवादी विचारांनी त्रस्त झाले आहेत. या गोष्टीचा विचार त्यांनी करायला हवा. काँग्रेसने देशाच्या संविधानावर हल्ला करण्याचे काम सुरू केले आहे. शंभरपेक्षा जास्त वेळा देशात राष्ट्रपती राजवट लावून देशालाच झटका देण्याचं काम काँग्रेसनं केलं. लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचीही गळचेपी केली. आता काँग्रेस धर्माच्या आधारावर आरक्ष देऊन संविधान बदलण्याच्या प्रयत्नात आहे, असा आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला. भारत सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या धारणेवरच पुढे जाऊ शकतो. जात, पंथ, धर्माच्या आधारे भेदभाव होऊ नये. क्षेत्रीय भेदभाव देखील होऊ नये, असे मोदी म्हणाले. काँग्रेसने आपल्या विभाजनकारी धोरण आणि वादग्रस्त वक्तव्यांनी देशाच्या राजकारणात वाद निर्माण केला आहे.

दहा वर्षांच्या सरकारच्या काळात भ्रष्टाचार संपला का नाही असा प्रश्न मोदींना या मुलाखतीत विचारण्यात आला. मोदी म्हणाले, फक्त तेच लोक भ्रष्टाचाराविरुद्ध लढू शकतात जे भ्रष्टाचारापासून मुक्त आहेत. भ्रष्टाचाराच्या बाबतीत आमच्या सरकारचं झिरो टॉलरन्स धोरण आहे. आम्ही भ्रष्टाचाराला देशातून मिटवून टाकू. धोक्याचं राजकारण संपवावं लागेल.

जेव्हापासून आमचं सरकार सत्तेत आलं आहे तेव्हापासून जे लोक भ्रष्टाचारावर उपदेश देण्याचं काम करत होते ते आता उघडे पडले आहेत. तपास यंत्रणांना पूर्ण मोकळीक सरकारने दिली आहे. इतकंच नाही तर या भ्रष्टाचाऱ्यांनी लुटलेला गरीबांचा पैसा त्यांना परत कसा देता येईल यासाठी आम्ही कायदेशीर मार्गदर्शन घेत आहोत, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 297

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स