ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मुणगे येथे उद्या श्री भगवती देवी माहेरस्वारी सोहळा ; विविध कार्यक्रमांचे आयोजन.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मुणगे येथे उद्या श्री भगवती देवी माहेरस्वारी सोहळा ; विविध कार्यक्रमांचे आयोजन.

प्रकाशन: 09 May 2024 05:45 PM
वाचन संख्या 140

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या मुणगे गांवची ग्रामदेवता श्री भगवती देवीचा माहेरस्वारी सोहळा १० मे रोजी होणार आहे. देवी भगवती  मुणगे गावातील कारीवणेवाडी येथे पाडावे कुटुंबीयांच्या घरी दर तीन वर्षांनी माहेरपणासाठी जाते. यानिमित्त कारीवणेवाडी येथे  विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १०.०० वा. वसंतपुष्प शैक्षणिक सामाजिक महिला उत्कर्ष संस्था भांडूप मुंबई तर्फे चित्रकला स्पर्धा, दुपारी ३.३० वा. श्री देवी भगवतीचे माहेर घरी (पाडावे बंधूंच्या घरी) देवालयातुन प्रस्थान, संध्याकाळी ५.०० वा. श्री देवी भगवती माहेर घरी आगमन, संध्याकाळी ७.०० वा. श्री देवी भगवती प्रासादिक भजन मंडळ सावंतवाडी, मुणगे यांचे सुश्राव्य भजन, संध्या ७.३० वा. महाप्रसाद, रात्रौ ९.३० वा. प्रकाश पा. लब्दे प्रस्तुत श्री देवी भगवती पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ देवगड मुणगे (डोंबिवली प.) यांचा पौराणिक दशावतारी नाट्य पुष्प ‘पुण्याई जन्माची’.

११ मे रोजी सकाळी ७.०० वा. श्री देवी भगवतीची ओटी भरणे व दर्शन, दुपारी १२.०० वा. महाप्रसाद, दुपारी ३.०० वा. श्री देवी भगवतीचे मंदिराकडे प्रस्थान होणार आहे.  १३ मे २०२४ सकाळी १०.०० वा. श्री सत्यनारायणाची महापूजा, संध्या ४.०० ते ६.०० हळदी कुंकू समारंभ, रात्रौ ७.०० वा. आरती व तीर्थ प्रसाद, रात्रौ ९.३० वा. आमने सामने डबलबारी भजनाचा जंगी सामना (२० x २०) डबलबारी भजनाचा जंगी सामना श्री विठ्ठल रखुमाई प्रासादिक भजन मंडळ, आजिवली, सोनारवाडी ( बुवा श्री. प्रविण सुतार) विरुद्ध श्री गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ ओरोस खुर्द ( बुवा श्री. ज्ञानदेव मेस्त्री) यांच्यात होणार आहे. उपस्थितीचे आवाहन पाडावे बंधु मुणगे, कारिवणेवाडी यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स