ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
साळशी येथील इनामदार श्री देव सिद्धेश्वर देवालयाचा शनिवार ११ मे रोजी वर्धापनदिन दिन सोहळा.

साळशी येथील इनामदार श्री देव सिद्धेश्वर देवालयाचा शनिवार ११ मे रोजी वर्धापनदिन दिन सोहळा.

प्रकाशन: 08 May 2024 12:24 PM
वाचन संख्या 145

शिरगांव | संतोष साळसकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या चौ-यांऐंशी खेड्यांचा अधिपती व ऐतिहासिक वारसा लाभलेल्या इनामदार श्री देव सिद्धेश्वर देवालयाचा शनिवार ११ मे रोजी वर्धापनदिन सोहळा साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८ वाजता इनामदार श्री देव सिद्धेश्वर व श्री देवी पावणाई देवालयात लघुरुद्र व बारा स्थळातील देव- देवतांवर अभिषेक , दुपारी १२ वाजता महाआरती, दुपारी १ वाजता महाप्रसाद, दुपारी ३ वाजता श्री सत्यनारायणाची महापुजा, सायंकाळी ५ वाजता तीर्थप्रसाद, रात्री ८ वाजता स्थानिक सुस्वर भजने, रात्री १० वाजता निगुर्डे ( सावंतवाडी ) येथील दशावतार मंडळाचा ‘शिव अघोरी संग्राम’ हा पौराणिक नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे. सर्व भाविकांनी उपस्थित राहून तीर्थप्रसाद व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे श्री देव सिद्धेश्वर पावणाई इनाम देवस्थान ट्रस्ट साळशी, बारा – पाच मानकरी व ग्रामस्थ मंडळीनी कळविले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स