श्री देवी घुमडाई मंदिराचा आज १३ वा वर्धापन दिन सोहळा.
मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या घुमडे गांवचे ग्रामदैवत श्री घुमडाई देवी मंदिरचा १३ वा वर्धापन दिन सोहळा आज बुधवारी ८ मे रोजी साजरा होत आहे. या निमित्ताने सकाळी ८ वा. पासून विविध धार्मिक कार्यक्रम आणि सकाळी ११ वा. सत्यनारायणाची महापूजा, दुपारी १२.३० वा. पालखी सोहळा, दुपारी १ वा. पासून महाप्रसाद, सायंकाळी ४ वा. सुश्राव्य भजने, रात्री ९ वाजता स्थानिक कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजीत करण्यात आले आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)