शेर्पे येथे काळेश्वरी मंदिरात श्रीफळ वाढवून महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचाराचा आरंभ.
खारेपाटण | प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टी शिवसेना, राष्ट्रवादी, आर पी आय व महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीचे कोकणातील रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील भाजपा उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचाराचा काल सोमवारी २९ एप्रिलला सकाळी शेर्पे येथील श्री देवी काळेश्वरी मंदिरात श्रीफळ वाढवून करण्यात आला. शेर्पे येथे नारायण राणे यांच्या करण्यात आलेल्या प्राचाराच्या वेळी माजी वित्त व बांधकाम सभापती, जि. प सदस्य बाळा जठार पं. स. सभापती दिलीप तळेकर, शाबान मुजावर – बूथ अध्यक्ष, स्मिता पांचाळ- सरपंच, सिराज मुजावर उपसरपंच, संतोष ब्रम्हदडे कुरंगावने सरपंच, बबलु पवार उपसरपंच कुरंगवने , बबन शेलार, राजश्री बेलनेकर ग्रामपंचायत सदस्य, शीतल कांबळे, मधुकर शेलार, सुरेश शेलार, अरुण ब्रम्हादडे, सुभाष शेलार, दिनेश मुद्रस, सुरेश शेलार मुंबई मंडळ अध्यक्ष, महमद जैतापकर, बाळू पांचाळ, रामा पांचाळ आणि भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)