ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
शिरगांव राक्षसघाटीत गवा रेड्याच्या हल्ल्यात कारचे प्रचंड नुकसान ; शनिवारची घटना.

शिरगांव राक्षसघाटीत गवा रेड्याच्या हल्ल्यात कारचे प्रचंड नुकसान ; शनिवारची घटना.

प्रकाशन: 29 Apr 2024 09:39 PM
वाचन संख्या 88

ग्रामस्थ आणि शेतकरी वर्गातही भीतीचे वातावरण.

शिरगांव | संतोष साळसकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील
देवगड – नांदगाव रस्त्यावर शिरगांव राक्षसघाटी येथे गव्याने प्रकाश गोगटे यांच्या कारवर केलेल्या हल्ल्यात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही घटना शनिवारी सायंकाळी ७:३० च्या दरम्यान घडली. प्रकाश गोगटे यांच्या मालकीची (एम. एच. ०७, ए. बी. २१९२) ही चारचाकी त्यांचे चालक सुहास तांबे हे कणकवलीहून जामसंडेकडे घेऊन जात होते. सायंकाळी ७:३० च्या सुमारास ते राक्षसघाटी येथे आले असता त्यांच्या चारचाकीला गव्याने धडक दिली. यात चारचाकीच्या दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून डाव्या बाजूच्या दोन्ही दरवाजांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनास्थळी गव्याचे केसही कारला अडकलेले दिसत होते. शिरगांव राक्षसघाटी येथे फेब्रुवारी महिन्यातही असाच गव्याने हल्ला केल्याने अपघात झाला होता. तर मार्च महिन्यात शिरगांव – कुवळे मार्गावर गव्याने दुचाकीवर हल्ला करून एका दुचाकीस्वाराला गंभीर जखमी केले होते. शनिवारी राक्षसघाटी येथे गव्याच्या हल्ल्यात चारचाकीचे सुमारे सहा लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अपघाताचे वृत्त समजताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. कारमालक प्रकाश गोगटे हे माजी आमदार आप्पा गोगटेंचे चिरंजीव आहेत.

या हल्ल्याने ग्रामस्थ व शेतकरी सुद्धा कमालीचे भयग्रस्त झाले आहेत. वनविभागाने या गवा रेड्यांच्या दहशतीची तत्काळ दखल घ्यायची मागणी होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स