ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
जांको राखे साईयां मार सके ना कोई ; जामसंडेत ५५ फूट खोल विहिरीत पडलेला  मुलगा बचावला..!

जांको राखे साईयां मार सके ना कोई ; जामसंडेत ५५ फूट खोल विहिरीत पडलेला मुलगा बचावला..!

प्रकाशन: 25 Apr 2024 07:07 AM
वाचन संख्या 103

देवगड : देवगड तालुक्यातील जामसंडे विद्यानगर परिसरात, बुधवारी संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास सुदीप विठ्ठल खरात हा एका विजापुरी कामगाराचा १० वर्षांचा मुलगा खेळत असताना अचानक जवळच्या एका ५५ फूट खोल विहिरीत पडला. या नंतर त्याचे स्थानिक व इतर विजापुरी कामगारांनी अथक प्रयत्न करत त्या मुलाला बाहेर काढले. सुमारे अर्धा तास तो पाण्यात होता तसेच अर्धा तास त्याने प्राणवायूच्या कमतरतेला देखील धैर्याने तोंड दिले. यानंतर त्याला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले व त्याची तब्येत ठीक असल्याचे सूत्रांकडून समजते आहे.

एका लहान मुलाच्या जीवावर बेतलेली ही घटना काळजाचा थरकाप उडवणारी अशीच होती परंतु त्यातून सुदीप खरात याचे या अपघातातून सुखरुप बाहेर पडणे हे ‘जांको राखे साईयां मार सके ना कोई’ या संत कबिरांच्या दोह्याची प्रचिती देणारे ठरले अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स