शेजवलीतील श्री. निनादेवी मंदिराच्या २३ वा वर्धापनदिन सोहळा ; विविध कार्यक्रमांचे आयोजन.
खारेपाटण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण जवळच्या
शेजवली येथील श्री निनादेवी मंदिर २३ वा वर्धापनदिन सोहळ्याच्या निमित्ताने २६ एप्रिल २०२४ रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी सकाळी ६.०० वा. अभिषेक, सकाळी ९.०० वा.श्री सत्यनारायण महापूजा सकाळी १०.०० ते ११.०० श्री निनादेवी- पन्हाळे, श्री भराडी देवी बांदिवडे, श्री जुगाई देवी – कोर्ले, श्री गांगेश्वर-गुंजवणे या देवतांच्या पालखीचे आगमन होणार आहे त्यानंतर सकाळी ११.०० ते १२.०० मान्यवरांचे सत्कार, दुपारी १२.०० ते २.०० वा. महाप्रसाद, दुपारी ३.०० ते ६.०० ढोलवादन व पालखी मिरवणूक रात्रौ १०.०० वाजता नवतरुण दशावतार नाट्य मंडळ, सुतारवाडी लोरे नं. २ यांचे महापौरांणीक नाटक ‘त्रिकाल मायाजाल’ अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांना उपस्थित राहून सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री निनादेवी देवस्थान शेजवली मुंबई व ग्रामस्थ मंडळ यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)