ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मालवण शहर एस टी बसस्थानकाची दुरावस्था मतदारांनी पहावी व परीक्षण करावे : भाजपा भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मालवण शहर एस टी बसस्थानकाची दुरावस्था मतदारांनी पहावी व परीक्षण करावे : भाजपा भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे.

प्रकाशन: 23 Apr 2024 03:11 PM
वाचन संख्या 102

भाजपाच्या विरोधात बोंबाबोंब करणे इतकेच काम खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांनी केले असल्याची भाजपा भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांची प्रसिद्धीपत्राद्वारे टीका…!

सिंधुदुर्ग : भाजपा भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष व रत्नागिरी प्रभारी नवलराज काळे यांनी खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. सध्याच्या निवडणुक प्रचारा दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात एस टी बसने प्रवास करताना नवलराज काळे हे मालवण बसस्थानक येथे आले असता त्यांना बसस्थानकाची दुरावस्था दिसल्याचे त्यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे स्पष्ट केले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुका हा पर्यटन तालुका म्हणून जगप्रसिद्ध आहे अनेक पर्यटक लांब दूरचे प्रवासी या मालवण तालुक्यात येत असतात. बहुतांशी पर्यटक प्रवासी व सामान्य जनता हे एसटी बस सेवेचा वापर करत असतात आणि ते थेट जर कोणी उतरायचे असेल तर ते एसटी बस डेपो वर उतरतात एसटी बस डेपो म्हणजे मालवण तालुक्याचे मुख/नाक आहे. अवस्था तर बेकार असेल तर मतदार संघामध्ये काय अवस्था असेल..? मराठी मध्ये म्हणतात ना शितावरून भाताचे परीक्षण तसेच अशा मुख्य प्रवाहात असणाऱ्या इमारतीची अवस्था बघून मतदारसंघामध्ये काय अवस्था असेल याचं परीक्षण मतदारांनी केलं पाहिजे असेही नवलराज काळे यांनी प्रसिद्धी पत्रात सांगितले आहे.

उबाठा गटाचे अकार्यक्षम १० वर्ष फुकट घालवणारे आमदार वैभव नाईक व अकार्यक्षम विद्यमान खासदार महाविकास आघाडीचे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार विनायक राऊत हे गेले दहा वर्षे खासदार म्हणून या जिल्ह्यामध्ये मिरवत आहेत. कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघांमधील आमदार आणि खासदार दोन्हीही एकाच विचाराच्या पक्षांमध्ये कार्यरत असताना जवळपास साडे सात वर्ष सत्ताधारी पक्षाचे देखील ते आमदार होते, खासदार होते असं असताना मालवण येथील एसटी बस डेपो म्हणजे अखंड मालवणचे मुख व नाक असलेलं ठिकाण. या एसटी बस डेपो ची अवस्था जर आपण पाहिली तर नक्की इथला आमदार खासदार किती जनतेच्या प्रश्नांना गांभीर्याने घेऊन काम करतो हे दिसून येईल. एसटी डेपो च्या इमारतीचे आरसीसी पिलरचे आतील लोखंड बाहेर येऊन पूर्ण गंजून गेले अशी अवस्था या डेपोची आहे. डेपो मध्ये उभे असलेले प्रवाशी जीव मुठीत घेऊन या डेपोचा वापर करीत आहेत. एका बाजूला राणेसाहेबांनी काय केला असा प्रश्न करत आम्हीच या जिल्ह्याचा विकास केला अशा खोटा व खोडसाळ दावा करून राणे साहेब आणि भाजपाच्या विरोधात बोंबाबोंब करून आपली लोकप्रियता वाढवायची एवढेच काम या आमदार खासदारांनी केलं.एसटी बस सेवा वापर करून जे पर्यटक नवनवीन प्रवासी जर मालवण येथे जेव्हा येतील तेव्हा नक्कीच विचार करतील अकार्यक्षम आमदार खासदार या भागात आहेत म्हणून ही अशी दुरवस्था झाली आहे. जे लोकप्रतिनिधी मुख्य प्रवाहात असणाऱ्या जनतेच्या जीवनमानाचा प्रश्न असणाऱ्या आणि लोकांच्या निदर्शनात येण्यासारख्या बाबीत लक्ष घालू शकत नाही, डेव्हलपमेंट करू शकत नाही त्याच्यावरून जनतेने या मतदारसंघांमध्ये काय काम झाली असतील याचा विचार करणे गरजेचे आहे. असे दहा वर्षे फुकट घालवणारे लोकप्रतिनिधी आपण पुन्हा पुन्हा निवडून द्यायचे का याचाही पुनर्विचार कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातील जनतेने केला पाहिजे असे नवलराज काळे यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे सांगितले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 447

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स