मसुरे चांदेरवाडी येथे २५ रोजी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम ; पुणे येथील कीर्तनकार ह. भ. प. केशव महाराज मुळीक यांचे २६ रोजी कीर्तन.
मसुरे | झुंजार पेडणेकर : मसुरे चांदेरवाडी येथे २५ ते २८ एप्रिल या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. यात २५ एप्रिल रोजी श्री ब्राह्मणदेव लघुरुद्र, २६ एप्रिल रोजी श्री कुळाचार मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा.
सायंकाळी ७ वाजता इंदापूर- पुणे येथील प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. केशव महाराज मुळीक यांचे कीर्तन होणार आहे. २८ एप्रिल श्री महासतीदेवी मंदिर येथे होम हवन कार्यक्रम होणार आहे. उपस्थितीचे आवाहन पूर्व सत्ता मानकरी मुळीक बंधू (चांदेर) यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)