ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन देवगड तालुका अध्यक्षपदी सौ. ज्योती जाधव यांची निवड.
सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील देवगड येथे ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन यांची सर्वसाधारण सभा , टिळक भवन देवगड येथे संपन्न झाली. यात सर्वानुमते सौ. ज्योती जयदीप जाधव यांची देवगड तालुकाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. सौ. ज्योती जाधव यांना संघटनेचे नियुक्तीपत्र व ओळखपत्र राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री. प्रमोद केसरकर यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी ह्यूमन राईटस् असोसिएशन फाॅर प्रोटेक्शनचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष योगेश मस्के, कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष मंदार काणे, मालवण तालुकाध्यक्ष सुधीर धुरी, संगमेश्वर तालुकाध्यक्ष पंढरीनाथ मोहिरे, मालवण तालुका उपाध्यक्ष प्रमोद कांडरकर, कणकवली तालुका संघटक मंगेश चव्हाण, देवगड तालुका संघटक श्रीकृष्ण दुधवडकर, सदस्य सौ. दिपाली आयरे, मालवण तालुका सदस्य श्री आचरेकर, सुरेखा जोशी, सौ. गुरव तसेच देवगड तालुक्यातील महिला व नागरीक उपस्थित होते. सौ ज्योती जाधव यांना पुढील वाटचालीसाठी सदिच्छा देण्यात आल्या.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)