मालवणात अपघात ; दुचाकीस्वाराचे निधन..!
मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरातील एस टी स्टॅन्ड ते पेट्रोलपंप दरम्यान स्टेट बॅन्क समोरील रस्त्यावर शुक्रवारी १९ एप्रिलला रात्री उशीरा झालेल्या दुचाकी अपघातात कुंभारमाठ येथील श्री अवधूत किशोर निकम यांचे निधन झाले. रात्री १० : ४० वाजण्याच्या सुमारास श्री. अवधूत हे मालवण शहर येथून त्यांच्या कुंभारमाठ येथील घरी दुचाकीवरुन जात असताना एक कुत्रा आडवा आल्याने हा अपघात होऊन त्यांच्या डोक्याला जबर मार बसला. यानंतर स्थानिकांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले परंतु उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. श्री. अवधूत निकम यांच्या निधनाने कुंभारमाठ व मालवण परिसरात शोक व्यक्त होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)