ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
जर बालपणीचे वैभव हरवतंय असे वाटतेय....तर एकदा वैभवी बनून बघुया..!

जर बालपणीचे वैभव हरवतंय असे वाटतेय....तर एकदा वैभवी बनून बघुया..!

प्रकाशन: 17 Oct 2021 10:35 PM
वाचन संख्या 354

महाविद्यायालयीन युवती कु.वैभवी दत्तप्रसाद पेडणेकरने वाटले तिच्या बालपणच्या शाळेत शैक्षणिक साहित्य व खाऊ…!

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : ‘काॅलेज म्हणजे धुंदी आणि काॅलेज म्हणजे मुक्ती ..काॅलेजमध्येच गवसते, सळसळती शक्ती….,” असा विचार महाविद्यालयात जाण्यापूर्वी शालेय विद्यार्थ्यांना येतो.
‘काॅलेज तथा महाविद्यालय म्हणजे शाळेच्या कडक शिस्तीतून थोडी ढ़ील असेल’,असा विचार मनात येत काॅलेजच्या आवारात पाऊल टाकले जाते. कालांतराने वाढता अभ्यास आणि आयुष्यातील आगामी स्पर्धेचे ताणतणाव यामुळे मन पुन्हा एकदा आपल्या प्राथमिक शाळेकडे वळते..
आता वय वाढलेले असते…आपल्या प्राथमिक शाळेच्या भिंतींनाही नविन रंग चढलेला असतो. शिक्षक शिक्षिकाही अदली बदली होऊन बदललेल्या असतात…छोटी छोटी चिमुरडी मुले आपल्याच शाळेत हक्काने बागडत असतात . मन खट्टू होते…ओरडून सांगावेसे वाटते त्या चिमुरड्या विद्यार्थ्यांना, ” अरे बाबांनो…ही प्राथमिक शाळा माझी आहे…हे माझे बालपण आहे  …हे माझे अंगण आहे..!”
पण तो आवाज मनातच विरतो . शाळेच्या भिंतींचा बदललेला रंगही ओळख दाखवत नसतोच.
भिंतीपल्याडच्या वर्गात प्रकाशाचा कवडसा बनून जावेसे वाटते परंतु तितकेही आपण उंच नाही हे मन जाणत असते.
बालपण हरवलंय याची जाणीव होते. चोरुन तरी शाळेत जावे, गुरुजी किंवा बाईंचा एखादा प्रेमळ धपाटा खावा आणि अगदी अंगठे धरुन ओणवेही रहावेसे वाटू लागते..!
पण शालेय बालपणाचे,चिंचा बोरांचे,चिमण्या दातांचे आणि शालेय उपक्रमांचे ते बालपण हरवते..!

परंतु एका बारावीत शिकणार्या काॅलेजयुवतीने म्हणजे कु.वैभवी दत्तप्रसाद पेडणेकर ह्या मुलीने त्यावर तिच्यापरीने चिमुकले बालपण जगायचा एक बोन्साय म्हणजे छोटासा परंतु हमखास प्राथमिक शाळेतील बालपणचे वैभव पुन्हा मिळवून देणारा उपाय शोधलाय…!
वैभवी ही मसुरे केंद्र शाळेची माजी विद्यार्थिनी आणि कुडाळ ज्युनियर कॉलेज बारावी सायन्सची  विद्यार्थिनी. तिने तिच्या वाढदिवसाचे निमित्त साधून तिच्या पाॅकेटमनीतून  साठवलेल्या पैशातून सामाजीक बांधिलकी व बालपणीच्या शाळेच्या वातावरणाचा एक वर्गभिंतींच्या आतील सहवास म्हणून आनंद घेत, मसुरे केंद्र शाळेतील २९ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि संपूर्ण प्रशालेला खाऊचे  वाटप केले.

या वैभवीच्या आनंद देवाण घेवाण कार्यक्रमावेळी बोलताना मसुरे केंद्र शाळेच्या मुख्याध्यापिका सौ शर्वरी शिवराज सावंत यांनाही वैभवीच्या या अनोख्या शाळा भेटीचे खूप कौतुक वाटले आणि त्या म्हणाल्या,” वैभवी पेडणेकर ही या प्रशालेची माजी विद्यार्थिनी असून तिच्या आजच्या या सामाजिक उपक्रमाची प्रेरणा  आपण सर्वांनी घेणे गरजेचे आहे. दरवर्षी ती शालेय गरज ओळखून आपला वाढदिवस या प्रशालेत विविध शैक्षणिक  उपक्रमातून साजरा करते.वैभवी आमची विद्यार्थिनी आहे  याचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान. यावेळी प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी शर्वरी सावंत, पदवीधर शिक्षक विनोद कदम, गुरुनाथ ताम्हणकर, श्रीमती रामेश्वरी मगर मॅडम, विनोद सातार्डेकर, हेमलता दुखंडे, श्रीयुत गावडे सर आणि विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी बोलताना वैभवी पेडणेकर म्हणाली, या प्रशालेचे आणि समाजाचे आपण देणं लागतो आणि या छोट्याशा उपक्रमातून मी सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा ही प्रयत्न केला आहे. मला घडविण्यात या प्रशालेचा व येथील शिक्षकांचा या गावाचा  मोठा वाटा आहे. या प्रशालेची आणि माझ्या मसुरे गावची  मी सदैव ऋणी राहीन. सूत्रसंचालन विनोद कदम आणि आभार गुरुनाथ ताम्हणकर यांनी मानले.

वैभवीने तिच्यापरीने बालपणचे प्राथमिक शाळेचे वैभव काही काळासाठीतरी मिळवून ताजे तवाने व्हायचा व सामाजिक बंध घट्ट करायचा एक सफल युवा प्रयत्न जरुर केलाय… आता वैभवीच्या वैभवाच्या या लहरीने, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेकांचे वैभवशाली बालपण परत मिळवायचा एक मार्ग नक्कीच खुला झालाय.
झालाय ना..?

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स