ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
येत्या 31 ऑक्टोबरला होणार संत रविदास भवनाचे भूमिपूजन ...!

येत्या 31 ऑक्टोबरला होणार संत रविदास भवनाचे भूमिपूजन ...!

प्रकाशन: 17 Oct 2021 07:37 PM
वाचन संख्या 149

सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ उभारणार हुमरमळा येथे समाज भवन

कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ जिल्हा सिंधुदुर्गच्या वतीने आमदार वैभव नाईक यांचे स्थानिक आमदार निधीतून भवनाच्या प्राथमिक बांधकामास सुरुवात होणार असून भवनाचा भूमिपूजन कार्यक्रम रविवार दि.31 ऑक्टोबर http://localhost/news/public/uploads/2021 रोजी हुमरमळा ता.कुडाळ येथे संपन्न होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष सुजित जाधव व जिल्हा सरचिटणीस चंद्रसेन पाताडे यांनी दिली आहे.
संत रविदास भवन इमारतीचा संकल्प चर्मकार समाजाने सोडला होता.यासाठी तत्कालीन जिल्हाध्यक्ष अनिल निरवडेकर यांच्या काळात हुमरमळा ता.कुडाळ येथे मंडळाचे नावे जागा घेण्यात आली होती.त्यानंतर याजागी भवन उभारावे म्हणून विद्यमान कार्यकारिणीने प्रयत्न सुरू केले होते.सुमारे 1 कोटी एवढ्या अंदाजपत्रकाच्या बांधकामाचे उद्दिष्ट असून यातील सुरुवातीचे काम आमदार वैभव नाईक यांचे स्थानिक आमदार निधीतून करण्यात येणार आहे.यासाठी आज आमदार नाईक यांची समाज मंडळाच्या वतीने भेट घेऊन भूमीपूजनाची तारीख निश्चित करण्यात आली.यावेळी आमदार नाईक यांना समाज भवनाचे रंगीत रेखाचित्र देण्यात येऊन माहिती देण्यात आली.यावेळी जिल्हाध्यक्ष सुजित जाधव ,जिल्हा सरचिटणीस चंद्रसेन पाताडे,जिल्हा कोषाध्यक्ष नामदेव जाधव,समिती प्रमुख महेंद्र चव्हाण, महानंद चव्हाण, लवेंद्र किंजवडेकर ,मालवण तालुकध्यक्ष सुनील पाताडे, जिल्हा सदस्य प्रभाकर चव्हाण, मधुकर चव्हाण,प्रसाद पाताडे,मनोहर पाताडे,नितीन पाताडे,समीर धमापूरकर,रुपेश जाधव, रोशन जाधव, सूरज जाधव, विठ्ठल चव्हाण, सुदर्शन तेंडुलकर, अनिल जाधव , अमित जाधव,मयूर चव्हाण,अमरेश तेंडुलकर आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स