ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
खारेपाटण एस टी बसस्थानकाची 'स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान' अंतर्गत झाली पहाणी.

खारेपाटण एस टी बसस्थानकाची 'स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान' अंतर्गत झाली पहाणी.

प्रकाशन: 18 Apr 2024 08:10 AM
वाचन संख्या 115

खारेपाटण | प्रतिनिधी : हिंदूहृदय सम्राट स्वर्गिय बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान अंतर्गत महाराष्ट्र राज्य एस टी महामंडळ रत्नागिरी विभगिय समितीच्या वतीने नुकतीच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण एस टी बस स्थानकाला रत्नागिरी विभाग नियंत्रक श्री प्रज्ञेश बोरसे यांनी भेट दिली आणि एस टी बस स्थानक परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत सर्वेक्षण समितीमध्ये म. रा. एस. टी. महामंडळ रत्नागिरी उपयंत्र अभियंता श्रीम. मृदुला जाधव, कामगार अधिकारी रत्नागिरी विलास चौघुले, सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटणकर, प्रवासी मित्र शिवाजी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. एस टी बस स्थानकाची पाहणी करण्यासाठी आलेल्या समितीचे खारेपाटण एस टी बस स्थानक वाहतूक नियंत्रक प्रमुख मनोहर चव्हाण यांनी स्वागत केले व खारेपाटण एस टी बस स्थानक सोयी सुविधा विषयी माहिती दिली.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील सर्वच एस टी बस स्थानकांचे स्वछ सर्वेक्षण अंतर्गत परीक्षण केले जात असून स्वछ व सुंदर बस स्थानक अंतर्गत खारेपाटण एस टी बस स्थानकाची आतापर्यंत तीन वेगवेगळ्या समितीने पाहणी केली असून आज पाहणी करण्यासाठी आलेली ही चौथी समिती आहे. या समितीचे प्रमुख प्रज्ञेश बोरसे यांनी खारेपाटण एस टी बस स्थानक स्वच्छते विषयी समाधान व्यक्त केले असून काही त्रुटीबाबत सूचना देखील केली आहे. समितीतील सदस्यांकडे १०० गुणांची आहे. तसेच प्रश्नावली देण्यात आली होती. या गुणांच्या आधारे राज्यातील सर्वांग सुंदर व स्वछ बसस्थानक ठरणार आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स