भाजपाकडून नारायण राणेंची उमेदवारी जाहीर..!
मुंबई | ब्यूरो न्यूज : गेले अनेक दिवस महाराष्ट्र राज्यात सर्वांचे लक्ष लागलेल्या रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवारी निश्चितीच्या चर्चांना आता विराम लागला आहे. भाजपा तर्फे नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर केली असून त्यानंतर राणे समर्थक कार्यकर्ते व नेते यांच्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
गेले आठवडाभर राणे समर्थक कार्यकर्त्यांनी विविध सामाजिक माध्यमांद्वारे नारायण राणे उर्फ दादा यांच्या उमेदवारीबद्दल खात्री व्यक्त केली होती.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)