ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
आरे ग्रामपंचायत सदस्य सुनील खरात आणि सामाजिक कार्यकर्त्या पूनम कोकरे यांच्यासहीत देवगड तालुक्यातील अनेक महिला भाजपात..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

आरे ग्रामपंचायत सदस्य सुनील खरात आणि सामाजिक कार्यकर्त्या पूनम कोकरे यांच्यासहीत देवगड तालुक्यातील अनेक महिला भाजपात..!

प्रकाशन: 16 Apr 2024 01:13 PM
वाचन संख्या 115

देवगड : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने तालुका पदाधिकारी कार्यकर्ता संवाद बैठकीचे आयोजन जिल्हाध्यक्ष नवलराज काळे व जिल्हा पदाधिकारी यांनी प्रदेश उपाध्यक्ष बाळा गोसावी यांच्या प्रमुख उपस्थितीत केले असून या बैठकीची सुरुवात देवगड तालुक्यातून करण्यात आली. या बैठकीचे नियोजन भटके विमुक्त आघाडीचे देवगड तालुका अध्यक्ष तथा लोकसभा संयोजक संतोष साळसकर यांनी केले. या नियोजनात तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, विधानसभा प्रभारी तथा पडेल मंडल अध्यक्ष बाळू कोकरे यांनी सहकार्य केले. भाजपा भटके विमुक्त आघाडीच्या पहिल्याच बैठकीत समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींचा पक्षप्रवेश घेण्यात आला. या पक्षप्रवेशामध्ये शिवसेना उबाठा गटाचे आरे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य सुनील खरात त्याचप्रमाणे देवगड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्या पुनम कोकरे (पोंभूर्ले), स्मिता काळे (मणचे), प्रतीक्षा गोरे (पोंभूर्ले) सुवर्णा काळे(मणचे), भानुबाई तांबे(मणचे) सुनंदा काळे(मणचे), संतोष कोकरे (गोवळ), संपदा कोकरे (गोवळ) या भटके विमुक्त जातीमधील बंधू-भगिनींचा समावेश आहे.

कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे व सिंधुदुर्ग जिल्हा भाजप भटके विमुक्त आघाडी यांच्या कार्यप्रणाली वर विश्वास ठेवत माजी आमदार ऍड.अजित गोगटे , भाजप भटके विमुक्त आघाडी प्रदेश उपाध्यक्ष बाळा गोसावी, जिल्हाध्यक्ष नवलराज काळे, देवगड तालुका अध्यक्ष संतोष किंजवडेकर, भाजप भटके विमुक्त आघाडी देवगड मंडलाध्यक्ष तथा लोकसभा संयोजक संतोष साळसकर, विधानसभा प्रभारी तथा पडेल मंडल अध्यक्ष बाळू कोकरे, जिल्हा खजिनदार महेश जंगले यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वांनी भाजप पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांनी सर्वांचे पक्षांमध्ये स्वागत केले. यावेळी माजी आमदार ऍड.अजित गोगटे , भाजप भटके विमुक्त आघाडी प्रदेश उपाध्यक्ष बाळा गोसावी, जिल्हाध्यक्ष नवलराज काळे, देवगड तालुका मंडळाध्यक्ष संतोष किंजवडेकर, भाजप भटके विमुक्त आघाडी देवगड मंडलाध्यक्ष संतोष साळसकर, पडेल मंडल अध्यक्ष बाळू कोकरे, जिल्हा खजिनदार महेश जंगले, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर, नगरसेविका तनवी चांदोसकर, नगरसेविका कावले, विलास मंचेकर, देवगड तालुका सरचिटणीस शरद ठुकरुल, दया पाटील भाजपा पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स