सावरवाड येथील दुचाकी अपघातातील गंभीर जखमी महिलेचे उपचारा दरम्यान निधन...!
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण – कसाल मार्गांवरील सावरवाड तिठा परिसरात दुचाकी खड्ड्यात गेल्याले झालेल्या अपघातात दुचाकीच्या मागे बसलेल्या गीता उमेश हिर्लेकर (वय ५० वर्षे) रा. वराड घाडेवळवाडी या रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली होती. त्यांना अधिक उपचारासाठी तातडीने गोवा बांबोळी येथे दाखल करण्यात आले होते. दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या गीता हिर्लेकर यांचा सोमवारी उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यू नंतर परिसरात शोक व्यक्त केला जात आहे. या परिसरातील खड्डे तत्काळ बुजविण्याची मागणी राजकीय कार्यकर्ते व ग्रामस्थांनी केली आहे.
रविवारी सायंकाळी गीता हिर्लेकर दुचाकीवरून कसालच्या दिशेन जात असताना हा अपघात घडला. गीता यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)