कणकवली उपजिल्हा रुग्णालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना १३३ व्या जयंतीनिमित्त अभिवादन.
कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती उपजिल्हा रुग्णालयात साजरी करण्यात आली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. विद्याधर हणमंते, डॉ. अमर पवार, डॉ. धनंजय रासम, अशोक नारकर, विनायक बर्गे, प्रमोद आवळे, श्रीमती कदम, सचिन तांबे, श्री. शिर्के, रुपेश जाधव आदी कर्मचारी वृंद उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)