ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
मालवण - कोळंब येथे स्टारलाईट रेस्टाॅरंटचा शुभारंभ .

मालवण - कोळंब येथे स्टारलाईट रेस्टाॅरंटचा शुभारंभ .

प्रकाशन: 12 Apr 2024 11:17 PM
वाचन संख्या 1183

उद्योजक श्री. प्रसाद कामतेकर आणि उद्योजिका सौ. रिया प्रसाद कामतेकर यांच्या ‘स्टारलाईट रेस्टाॅरंट’ उद्घाटनप्रसंगी मान्यवरांची उपस्थिती.

सिंधुदुर्ग | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या कोळंब – ओझर रोडवरील खडवण नाका येथे हाॅटेल उद्योजक दांपत्य श्री. प्रसाद उत्तम कामतेकर व सौ. रिया प्रसाद कामतेकर यांच्या स्टारलाईट रेस्टाॅरंटचा शुभारंभ शुक्रवारी १२ एप्रिल रोजी सायंकाळी झाला. श्री. प्रसाद कामतेकर यांचे वडिल श्री. उत्तम कामतेकर व आई सौ. लक्ष्मी उत्तम कामतेकर यांच्या हस्ते स्टारलाईट रेस्टॉरंटचे उद्घाटन करण्यात आले.

पंजाबी, चायनीज, तंदूर, मालवणी अशी वैशिष्ट्ये असणारे हे रेस्टाॅरंट स्थानिक खवय्ये मंडळी तसेच पर्यटकांसाठी खुले करताना याद्वारे ग्राहकांना दर्जेदार चव आणि उत्तम सेवा देता देणे हा एक आनंद असल्याचे मनोगत यावेळी प्रसाद कामतेकर व सौ. रिया प्रसाद कामतेकर यांनी व्यक्त केले.

स्टारलाईट रेस्टाॅरंटच्या उद्घाटन प्रसंगी कोळंब सरपंच सौ. सिया धुंरी, उपसरपंच विजय नेमळेकर, ग्रामपंचायत सदस्य मंगेश चव्हाण, विशाल फणसेकर, युगलकिशोर प्रभूगांवकर, पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष मंगेश जावकर, उद्योजक अवी नेरकर, भूपेश ढोलम, संदीप भोजने, मनोज चव्हाण, पंकज कवटकर, सहिष्णू पंडित, तेजस निवेकर, दाजी प्रभूगांवकर, किसन मांजरेकर, सिद्धेश चव्हाण, बंटी कांबळी, संकेत हसोळकर, हर्षद कांबळी, रिना मराळ , संजय परब व अन्य उपस्थित होते.

स्टारलाईट रेस्टाॅरंटच्या शुभारंभ प्रसंगी मालवण पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे तसेच सहकारी पोलिस गुरुप्रसाद परब, पोलिस पांचाळ, कोळंब – हडी बीट पोलिस हवालदार हेमंत पेडणेकर व पोलिस हवालदार सुशांत पवार, उद्योजक अवी नेरकर, उद्योजक नार्वेकर, उद्योजक अण्णा कामतेकर तसेच सर्व क्षेत्रातील मान्यवर आणि कोळंब व मालवण वासिय यांनी स्टारलाईट रेस्टाॅरंटचे मालक श्री. प्रसाद कामतेकर व सौ. रिया प्रसाद कामतेकर यांना शुभेच्छा दिल्या.

स्टारलाईट रेस्टाॅरंटचे मालक श्री प्रसाद कामतेकर व सौ. रिया प्रसाद कामतेकर.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स