मालवणात होणार एक दिवस आड पाणी पुरवठा...!
मालवण | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरात १५ एप्रिल पासून, उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर एक दिवस आड पाणी पुरवठा होणार असल्याची माहिती नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. धामापूर तलावातील पाण्याची पातळी कमी होत असल्याने एक दिवस आड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नगरपरिषदे मार्फत शहरात करण्यात येणारा पाणीपुरवठा १५ एप्रिल पासून दिवसाआड करण्यात येईल याची नोंद सर्व नळ धारकांनी नोंद घ्यावी व नगरपरिषदेस करावे असे आवाहन पालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
झोन एक मध्ये १५ एप्रिल रोजी शहरातील आडारी रोड गणपती मंदिर पर्यंत, श्री देव नारायण मंदिर समोरील परिसर, शांतीसागर मैदान परिसर, पेट्रोल पंप समोरील परिसर, कुडाळकर हायस्कूल नजिकचा परिसर, रेडकर हॉस्पिटलच्या आजूबाजूचा परिसर, गवंडीवाडा, दांडी मोरेश्वर मंदिर परिसर, आडवण वायरी रोड, रामेश्वर मंदिर मागील परिसर, सातेरी मंदिर जवळील परिसर या भागात पाणीपुरवठा होईल.
झोन दोन मध्ये १६ एप्रिल रोजी धुरीवाडा गारुडेश्वर मंदिर पर्यंत, श्रीकृष्ण मंदिर परिसर, चिवला बीच ते चौकचार रोड, कोतेवाडा कचेरी रोड, मेढा काळबादेवी रोड, पोलीस वसाहत ते राजकोट, जय गणेश मंदिर परिसर, भूत आंबा ते रेवतळे चर्च रोड, फाटक शाळा परिसर, भरड ते बंदरजेटीपर्यंत, लिमये हॉस्पिटल ते पोस्ट ऑफिस समोरील परिसर या भागात पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)