महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यासह २.५ लाख वंचित युवकांना कौशल्य प्रशिक्षण व रोजगाराची संधी.
महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यासह २.५ लाख वंचित युवकांना कौशल्य प्रशिक्षण व रोजगाराची संधी.
मॅजिक बस इंडिया फाउंडेशनच्या प्रस्तावाचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत.
मुंबई | ब्यूरो न्यूज : महाराष्ट्रातील नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, चंद्रपूर, नाशिक आणि सिंधुदुर्ग या सात जिल्ह्यांमधील २.५ लाखांहून अधिक वंचित युवकांपर्यंत पुढील पाच वर्षांत पोहोचून त्यांना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या मॅजिक बस इंडिया फाउंडेशनच्या प्रस्तावाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले आहे.
मॅजिक बस इंडिया फाउंडेशनच्या या उपक्रमामध्ये जीवन कौशल्ये, रोजगारक्षमतेचे प्रशिक्षण, उद्योजकता विकास आणि रोजगाराशी जोडणी यांचा एकात्मिक समावेश आहे. महिलांचा श्रमशक्ती सहभाग वाढविणे, स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देणे, ग्रामीण उद्योजकता वाढविणे तसेच पदवीधर युवकांमध्ये रोजगारासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करणे या शासनाच्या प्राधान्यक्रमांशी हा उपक्रम सुसंगत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
या उपक्रमासाठी आवश्यक सहकार्य विभागामार्फत करण्यात येईल. तसेच निधीचे अभिसरण आणि औपचारिक सामंजस्य करार (MoU) करण्यासाठीही आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
कट्टा येथे हिरकणी प्रभाग संघ सुकळवाडची वार्षिक सभा संपन्न.
कट्टा येथे हिरकणी प्रभाग संघ सुकळवाडची वार्ष...
कणकवली नगरपंचायत नगराध्यक्ष संदेश पारकर व उप नगराध्यक्ष सुशांत नाईक यांना अप्पासाहेब पटवर्धन चौक येथील नगरपंचायतच्या मालकीच्या जागेतील जेष्ठ व्यापारी तसेच व्यावसायिकांची भेट आणि निवेदन.
कणकवली नगरपंचायत नगराध्यक्ष संदेश पारकर व उप...