ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मालवण शहरातील वेशभूषा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद ; हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीचे आयोजन.

मालवण शहरातील वेशभूषा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद ; हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीचे आयोजन.

प्रकाशन: 11 Apr 2024 03:54 AM
वाचन संख्या 93

मालवण : मालवण शहरात गुढीपाडव्याच्या निमित्त १० एप्रिलला हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या यांच्या वतीने आयोजीत वेशभूषा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेतील बालगटात नील रोगे, दुसऱ्या गटात स्वर्णीम काळसेकर, खुल्या गटात भावेश तळासकर तर नऊवारी साडी मध्ये अमृता फाटक यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेसाठी विविध गटातून ८८ स्पर्धकांनी सहभाग घेतला.

स्पर्धेचा उर्वरित निकाल पुढीलप्रमाणे आहे. बालगट – द्वितीय- विहान गावकर, तृतीय- सारा पवार, उत्तेजनार्थ- सिया कदम, स्वराली धुरी.

दुसरा गट- द्वितीय- क्रिश नेसुरकर, तृतीय- रेवा जोशी, उत्तेजनार्थ- सार्थक गांगनाईक, कौशल गावकर, नऊवारी साडी-द्वितीय- नयना केळुसकर.

मामा वरेरकर नाट्यगृह परिसरात स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक तसेच सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती समन्वयक भाऊ सामंत, विजय केनवडेकर, बंटी केनवडेकर, प्रशांत हिंदळेकर, अमित खोत, कृष्णा ढोलम, सौगंधराज बादेकर, संदीप बोडवे, संजय गावडे, वेदिका केनवडेकर, अंजली केनवडेकर, गणेश कुशे, संजय गावडे, सुजाता यादव यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स