ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
केंद्र शाळा साळशी मधील कौस्तुभ गावकर व पारस वरेरकर यांची नवोदय विद्यालयासाठी निवड ; शाळेच्या यशाची परंपरा कायम.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

केंद्र शाळा साळशी मधील कौस्तुभ गावकर व पारस वरेरकर यांची नवोदय विद्यालयासाठी निवड ; शाळेच्या यशाची परंपरा कायम.

प्रकाशन: 04 Apr 2024 04:37 PM
वाचन संख्या 118

शिरगांव | संतोष साळसकर : देवगड तालुक्यातील जि. प. केंद्र शाळा साळशी नं. १ च्या कौस्तुभ गांवकर व पारस वरेरकर या दोन्ही विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालय सांगेली येथे निवड झाली आहे. या प्रशालेतून मागील वर्षीही ३ विद्यार्थ्याची नवोदयसाठी निवड झाली होती.यावर्षीही २ विद्यार्थ्यांची निवड झाली असल्याने या शाळेने यशाची पंरपरा कायम राखली आहे. फेब्रुवारी २०२३ – २४ या शैक्षणिक वर्षांत घेण्यात आलेल्या नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत केंंद्र शाळा साळशी नं. १ या प्रशालेतून ३ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी कौस्तुभ गावकर व पारस वरेरकर या विद्यार्थ्यांनी यश संपादन करुन त्यांची नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे.

या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक गंगाधर कदम, पदवीधर शिक्षक संतोष मराठे, उपशिक्षिका हेमलता जाधव, वर्गशिक्षिका स्मिता कोदले यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या निवडीबद्दल सरपंच वैशाली सुतार,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष साळसकर, शिक्षक वर्ग, पालक व ग्रामस्थ यानी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स